Dhan Nondani Agrowon
ताज्या बातम्या

Dhan Nondani : धान नोंदणीकरिता सात जानेवारीपर्यंत मुदतवाढ

शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने निर्णय

Team Agrowon

गोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर (Online Portal) नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने शासनाने नोंदणीसाठी सात जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते.

मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून धान खरेदी केंद्रावर झालेल्या गैरव्यवहारामुळे शासनाने यावर्षीपासून धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अनिवार्य केली आहे.

यासाठी संबंधित शेतकऱ्याचा फोटो, सातबारा, पीक पेरा प्रमाणपत्र, नमुना ८ व इतर कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

त्याशिवाय शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करता येत नाही. जिल्ह्यात दोन लाख ६८ हजार खातेदार शेतकरी आहेत.

यापैकी दरवर्षी दीड लाख शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करतात.

जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख २९ हजार शेतकऱ्यांनी हमीभावाने धान विक्री करता नोंदणी केली आहे तर अजूनही काही शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत.

३१ डिसेंबर ही नोंदणीची अंतिम दिनांक होती.

पीकपेरा प्रमाणपत्राची मदत

धानाला बोनस मिळण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने खरीप हंगामात शेतात धानाची लागवड केली असणे गरजेचे आहे.

यासाठी शेतकऱ्यांना पीकपेरा प्रमाणपत्राची मदत होणार आहे. त्यामुळे सध्या हे प्रमाणपत्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irrigation Wells: रखडलेल्या ११० सिंचन विहिरींना पुन्हा जीवदान

MahaDBT Seed Distribution: बियाणे वितरणात लोहा कृषी कार्यालयाची जिल्ह्यात आघाडी

Amit Shah: साखर कारखान्यांसाठी अमित शहांकडून मोठी घोषणा, कोल्हापुरात १,५०० कोटींचा संयंत्र प्रकल्प उभारणार

Malshiras Road Accident: माळशिरस वाहन अपघातप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी समिती गठीत

Stale Seedbed Technique: स्टेल सीडबेड तंत्र- तण नियंत्रणाचा सोपा मार्ग

SCROLL FOR NEXT