Agricultural Degree Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Degree : कृषी पदवीच्‍या नोंदणीस मुदतवाढ

Agriculture Education : कृषी शाखेतील विविध पदवी अभ्यासक्रमांच्‍या नोंदणीची रविवार (ता. ९)पर्यंत असलेली अंतिम मुदत वाढविली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता विद्यार्थ्यांना १६ जुलैपर्यंत नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

Team Agrowon

Nashik News : कृषी शाखेतील विविध पदवी अभ्यासक्रमांच्‍या नोंदणीची रविवार (ता. ९)पर्यंत असलेली अंतिम मुदत वाढविली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता विद्यार्थ्यांना १६ जुलैपर्यंत नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. तर पहिली वाटप यादी २९ जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे.

विज्ञान शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण व एमएचटी-सीईटी किंवा, जेईई, नीट या प्रवेश परीक्षा दिलेल्‍या विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या या परीक्षांतील कामगिरीच्‍या आधारे कृषी शाखेतील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी नोंदणी करण्याची संधी उपलब्‍ध आहे.

प्रवेशप्रक्रियेच्या नवीन वेळापत्रकानुसार, केंद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील व महाविद्यालयनिहाय व प्रवर्गनिहाय शेवटच्या प्रवेशित गुणांच्या तपशिलाची प्रसिद्धी १४ ऑगस्ट रोजी ५.३० वाजेनंतर होणार आहे. रिक्त जागांकरिता केंद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरी १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान होईल.

पदवी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक असे...

-नोंदणीसाठी वाढीव मुदत...१६ जुलै

-अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी...२० जुलै

-ऑनलाइन तक्रार नोंदणी...२१ ते २३ जुलै

-विचारात घेण्यात आलेल्या तक्रारींच्या यादीची प्रसिद्धी...२५ जुलै

-अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी...२७ जुलै

-पहिल्‍या फेरीची वाटप यादी...२९ जुलै

-प्रवेश निश्‍चितीची मुदत...३० जुलै ते १ ऑगस्‍ट दुसऱ्या -फेरीची वाटप यादी...३ ऑगस्‍ट

-प्रवेश निश्‍चितीची मुदत...४ ते ६ ऑगस्‍ट.

-तिसऱ्या फेरीची वाटप यादी...९ ऑगस्‍ट

-प्रवेश निश्‍चितीची मुदत...१० ते १२ ऑगस्‍ट.

-ऑनलाइन प्रवेश निश्चित झालेल्यांना मूळ कागदपत्रे व आवश्यक शुल्क भरण्याचा कालावधी...१० ते १३ ऑगस्ट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Rate: देशांतर्गत बाजारात नागपुरी संत्रा खातोय भाव

Bacchu Kadu: स्वतंत्र लढा उभारून तत्काळ कर्जमाफी मिळवावी

Grape Season: अर्ली हंगामाच्या इतिहासात मुहूर्ताला यंदा उच्चांकी दर

Maharashtra Weather: नोव्हेंबर महिन्यात राज्यात थंडी कमी राहणार

Rain Alert: पावसाचा जोर ओसरणार, तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT