
डॉ. एस. टी. काळवाघे, डॉ. एस. डी. मोरेगावकर, डॉ. जी. आर. गंगणे
Maharashtra Animal and Fisheries Science University : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (महाराष्ट्र) अंतर्गत नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, सेमिनरी हिल्स, नागपूर, मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, परळ, मुंबई, पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी, पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, क्रांतिसिंह नानासाहेब पाटील पशुवैद्यक महाविद्यालय, शिरवळ, पशुवैद्यकीय पदव्युत्तर संस्था, अकोला येथे पशुवैद्यकीय पदवी शिक्षणाची संधी आहे.
पशुवैद्यकीय अभ्यासक्रम
- एक वर्षाच्या इंटर्नशिप प्रोग्रॅमसह साडेपाच वर्षांचा अभ्यासक्रम.
- पदवी प्रवेशासाठी अर्जदाराने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजीसह (१०+२ नमुना किंवा त्याचे समतुल्य) ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक. खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के आणि मागास प्रवर्गासाठी ४७.५० टक्के गुण आवश्यक.
- पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वैद्यकीय विज्ञानांसाठीची
- NEET परीक्षा उत्तीर्ण लागते. राज्य सरकार आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमांनुसार दरवर्षी प्रवेश केले जातात.
- वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये व्हीसीआय
- कोटा आणि एनआरआय कोटा असतो. यासाठीची प्रवेश क्षमता, प्रवेश प्रक्रिया स्वतंत्र आहे.
- बी.व्ही.एससी. आणि ए.एच. पदवीधर विद्यार्थी हे पदव्युत्तर पदवी (M.V.Sc) आणि वेगवेगळ्या विषयातील डॉक्टरेट पदवी (PhD) प्राप्त करू शकतात.
संकेतस्थळ
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर संकेतस्थळावर (www.mafsu.ac.in) भेट देऊन ऑनलाइन अर्ज करता येतो.
रोजगार संधी
- भारतीय पशुवैद्यकीय परिषद (व्ही.सी.आय.), नवी दिल्ली किंवा राज्य पशुवैद्यकीय परिषद, नागपूर येथे नोंदणीकृत असलेल्या कोणत्याही पशुवैद्यकीय पदवीधर (बी.व्ही.एससी. आणि ए.एच. पदवीधारक), राज्य / देशामध्ये उच्च शैक्षणिक(M.V.Sc.) आणि पुढे आचार्य पदवी (Ph.D.) शैक्षणिक पात्रता मिळविण्यास पात्र आहेत.
- पशुधन विकास अधिकारी-वर्ग १, राज्य / केंद्रीय दवाखान्यात आणि पशुवैद्यकीय सेवांमध्ये वैज्ञानिक / संशोधक म्हणून विविध शैक्षणिक संस्था, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे नोकरीची संधी.
- फार्मास्युटिकल उद्योग / औषध / औषधी उत्पादक आणि विपणन उद्योग यासारख्या शासकीय / खासगी / शासन साह्य संस्थांमध्ये रोजगार संधी.
- लस उत्पादन, विपणन आणि संशोधन संस्था, सहकारी डेअरी, कुक्कुटपालन आणि इतर पशुधन उद्योग, खासगी पशुवैद्यकीय दवाखाने, खासगी डेअरी / कुक्कुट / मेंढी व शेळी पशुसंवर्धन उद्योगामध्ये संधी.
- - तसेच शासकीय, नीम शासकीय आणि शासकीय अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये नोकरी.
- भारतीय प्रशासकीय सेवा, राज्य प्रशासकीय सेवेतून अधिकारी म्हणून संधी.
- राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांमध्ये तांत्रिक अधिकारी / ग्रामीण विकास अधिकारी / क्षेत्र अधिकारी.
- वनविभाग, वन्यजीव अभयारण्य आणि राज्य / राष्ट्रीय वन विभाग.
- परदेशात उच्च शिक्षण, उद्योगामध्ये नोकरी. मांस व मांस उत्पादन उत्पादक, विपणन आणि संशोधन उद्योगामध्ये संधी.
- भारतीय सैन्यात पशुवैद्यकीय दल, पोलिस आणि सुरक्षा एजन्सीच्या खास पथकांमध्ये उदा. श्वान पथक वगैरे ठेवण्यासाठी, बॉम्बशोधक पथकामध्ये संधी.
- स्वतंत्र पशुवैद्यक व्यावसायिक म्हणून पाळीव प्राणी तसेच श्वानांचा दवाखाना. पाळीव प्राण्यांचे गोठे, कुक्कुटपालन, डॉग ब्रीडिंग फार्म यांसारखे स्वतंत्र व्यवसाय.
- राष्ट्रीय तसेच मानव रोग संशोधन संस्था, इतर संस्थांमध्ये (टाटा कर्करोग संस्था) पशुवैद्यकांना संधी.
संपर्क - डॉ. एस. टी. काळवाघे, ९४२०२१६४०७, (लेखक पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी येथे कार्यरत आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.