World Soil Day
World Soil Day Agrowon
ताज्या बातम्या

World Soil Day : जागतिक मृदादिनी बोर्डी येथे तज्ज्ञांचे मार्गदर्शन

टीम ॲग्रोवन

बोर्डी, जि. अकोला ः महाराष्ट्र शासन आणि कृषी विभागाच्या (Agriculture Department) संयुक्त विद्यमाने अकोट तालुक्यातील बोर्डी येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातंर्गत (National Sustainable Agriculture Mission) मृद आरोग्य (Soil Health) पत्रिका शिफारशींवर आधारित रासायनिक खत (Chemical Fertilizer) व्यवस्थापनविषयक शेतकरी प्रशिक्षण आणि जागतिक मृदा दिनाचा (World Soil Day) कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली.

बोर्डी येथे नागास्वामी महाराज मंदिरात सोमवारी (ता.५) सकाळी हा प्रशिक्षण वर्ग झाला. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी पर्यावरणशास्त्र केंद्रामधील सहायक प्रा. डॉ. नितीन एम. कोंडे, कृषी महाविद्यालयातील सहायक प्रा. डॉ. नीलम कणसे, तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तज्ज्ञांनी मातीचे आरोग्य कसे सांभाळले पाहिजे, उत्पादन वाढीच्या दृष्टीने त्याची किती आवश्‍यकता आहे हे पटवून दिले. तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे यांनी रासायनिक खतांमुळे खालावत चाललेले जमिनीचे आरोग्य हा एक चिंतेचा विषय बनल्याचे सांगितले. यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारेल आणि सेंद्रिय कर्बामध्ये सुधारणा होईल असे सांगितले.

कार्यक्रमाला कृषी सहाय्यक ईश्वर बैरागी, कृषी सहाय्यक ठाकरे यांच्यासह विजय राऊत, गोकुळ लटकुटे, सुनील लाहोरे, राजेश विस्थापित, प्रशांत धर्मे, विनोद गये, राम भालतिलक, पंकज धर्मे, किशोर बोंद्रे, अनुप महाले, विलास चेडे, हरी वनकर, विष्णू पकाले, अनंत होरे, कैलास राऊत, दिनू घोडकी, रामदास राऊत, समाधान चंदन, प्रवीण बुले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT