Cotton Production Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Production : कापूस उत्पादनवाढीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा प्रयोग महत्त्वाचा

येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कापूस उत्पादन वाढीसाठी नव्या तंत्रावर आधारित प्रयोग सुरू आहे.

Team Agrowon

अकोला ः येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कापूस उत्पादन (Cotton Production) वाढीसाठी नव्या तंत्रावर आधारित प्रयोग सुरू आहे. यामध्ये ठिबक सिंचन, फर्टिगेशन व कापूस पीक संरचना व्यवस्थापनावर जोर दिला जात आहे.

याचे सकारात्मक निष्कर्ष मिळाले आहेत. ‘‘शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. त्यामुळे या बाबतचे निष्कर्ष पुढील ‘ज्वाइंट ॲग्रोस्को’मध्ये मांडावेत,’’ अशी सूचना राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी केली.

नव्या तंत्रावर आधारित या प्रयोगाची डवले यांनी शुक्रवारी (ता. ११) विद्यापीठाच्या या प्रक्षेत्रावर जाऊन पाहणी केली. कुलगुरू डॉ. शरद गडाख व संबंधित शास्त्रज्ञांकडून प्रयोगाची माहिती घेतली. विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. बी. उंदीरवाडे, ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक संतोष आळसे, शास्त्रज्ञ डॉ. संजय काकडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, डवले यांनी कापूस संशोधन केंद्रासह उद्यानविद्या व इतर प्रक्षेत्रांनाही भेट दिली. बाजारपेठेत कापसाचा दर वाढल्याने या पिकाच्या लागवडीकडे शेतकरी पुन्हा वळू लागले आहेत. कापूस हे आधीपासूनच विदर्भातील महत्त्वाचे पीक आहे. गेल्या काही वर्षांत उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा ताळमेळ बसणे कठीण झाले. अशा परिस्थितीत गरजेवर आधारित संशोधनाचा भाग म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात प्रक्षेत्रावर कापूस पिकात हा आगळावेगळा प्रयोग सुरू आहे.

कापूस उत्पादनवाढ शक्य

कापूस पिकाची कायिक वाढ थांबवणे, गवळ फांद्या कापणे, कापूस पिकाच्या कालावधीनुसार शेंडे खुडणे असे तंत्रज्ञान या प्रयोगात वापरले जात आहे. बोंडाचे वजन तसेच प्रतिझाड बोंडांची संख्या वाढविली आहे. त्यातून कापूस उत्पादनात वाढ करणे शक्य होऊ शकते, हे दिसून आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’विरोधात ‘चक्का जाम’

Sugarcane Productivity : ‘हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ’ अभियानास कोल्हापुरात प्रारंभ

Agriculture Irrigation : गतवर्षीच्या तुलनेत सिंचनासाठी १६ टीएमसीने उपसा कमी

SCROLL FOR NEXT