PDCC Bank Agrowon
ताज्या बातम्या

PDCC Bank : पीडीसीसी’ बॅंकेत महिला बचत गटांच्या वस्तूचे प्रदर्शन

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील स्वयंसाह्यता बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या दिवाळी वस्तूंची विक्री सुरू आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) (NABARD) व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Pune District Central Cooperative Bank) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील स्वयंसाह्यता बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या दिवाळी वस्तूंची विक्री सुरू आहे. ही विक्री महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक बी. जे. रोड, पुणे (Maharashtra State Cooperative Agricultural and Rural Multipurpose Development Bank B. J. Road, Pune)येथे ही विक्री सुरू राहणार आहे.

प्रदर्शनाचे उद्‌घाटन बुधवारी (ता. १९) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे व नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक गोवर्धनसिंह रावत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी व्यवस्थापक रश्मी दराड, रोहन मोरे, बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक विकास दांगट, प्रवीण शिंदे, निर्मलाताई जागडे व कु. पुजा बुट्टे पाटील व बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी विजय टापरे आदी उपस्थित होते.

प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू, खाद्य पदार्थांना बाजारपेठ मिळवून देणे व महिलांचे सक्षमीकरण करणे हा उद्देश असल्याचे बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त लोकांनी प्रदर्शनास भेट देऊन महिला सबलीकरणास हातभार लावण्याचे आवाहन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

Borewell Crackdown : बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’ची ४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींना विकल्याचा आरोप

Panchnama Update : सोलापुरात ३५ टक्के दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांच्या सवलतीवर गदा

SCROLL FOR NEXT