Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : नववर्ष आले तरी नुकसानभरपाईचा पत्ता नाही

जिल्‍ह्यात या वर्षात खरीप हंगामात सातत्याने पावसामुळे नुकसान झाले. प्रामुख्याने पीक काढणीच्या अवस्थेत झालेल्या पावसाने हंगामाची माती केली. पीकवाढ व उत्पादन घरात यायच्या काळात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी, संततधार पाऊस पडला.

टीम ॲग्रोवन

अकोला ः जिल्‍ह्यात या वर्षात खरीप हंगामात सातत्याने पावसामुळे नुकसान (Crop Damage) झाले. प्रामुख्याने पीक काढणीच्या अवस्थेत झालेल्या पावसाने हंगामाची माती केली. पीकवाढ व उत्पादन घरात यायच्या काळात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी, संततधार पाऊस पडला. यामुळे ६० टक्क्यांवर हंगाम वाया गेला. या शेतकऱ्यांना मदतीची (Crop Damage Compensation) अद्याप प्रतीक्षा आहे. दोन महिन्यांत सुमारे २६२ कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून, याचा अहवाल वरिष्ठांकडे गेलेला आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी घास हिरावून घेतला. या पावसाने ९१ हजार ४०४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीपोटी मदत म्हणून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४२ कोटी ९६ लाख ८ हजार ८८४ रुपयांची मागणी केली होती.

ऑक्टोबर महिन्यातही जोरदार पाऊस झाल्याने नुकसानाचे तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांमार्फत संयुक्त पंचनामे झाले. ऑक्टोबर महिन्यात सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे ११९ कोटी ६२ लाख २९ हजार ३४४ लाख रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये १ लाख २९ हजार ५२ शेतकऱ्यांना फटका बसला.

८१ हजार ६७१ हेक्टरवरील जिरायती, बागायती व फळ पिकांचे नुकसान झालेले आहे. मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने ११९ कोटी ६२ लाख २९ हजार ३४४ रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. आता नागपूर हिवाळी अधिवेशनाची लगबग सुरू झाली आहे. या अधिवेशन काळात तरी मदत मिळेल अशी अपेक्षा होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Cold Wave: राज्यात थंडी पुन्हा वाढली; निफाड येथे निचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Rabi Crop Insurance: रब्बी हंगामात पीकविम्याबाबत शेतकरी उदासीन

Soil Health: शाश्‍वत पर्यावरण, मानवी आरोग्यासाठी मृदा संवर्धन महत्त्वाचे...

NAFED Soybean Procurement: वाशीम बाजार समितीत नाफेड केंद्राचे उद्‌घाटन

Kesar Mango Cultivation: शेतकऱ्याने निवडला अतिसघन केसर आंबा लागवडीतून उत्पादनवाढीचा नवा मार्ग

SCROLL FOR NEXT