Water Crisis  Agrowon
ताज्या बातम्या

Water Crisis : पावसाळा संपत आला तरी शेटफळगढेमध्ये टँकरने पाणी

Water Shortage : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील समाधानकारक पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

Team Agrowon

Indapur News : पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी गावासाठी टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील समाधानकारक पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे शेटफळगढे (ता. (इंदापूर) येथे गेल्या काही दिवसांपासून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

येथील बारामती अँग्रो साखर कारखान्याच्या वतीने गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर दिला आहे गेल्या काही दिवसापूर्वी दररोज दोन खेपा टाकण्याचे काम केले जात होते मात्र मध्यंतरी कालव्याला पाणी आल्यानंतर या खेपांचे संख्या कमी करण्यात आली आहे सप्टेंबर महिना संपत आला, तरी जोरदार पाऊस झाला नाही त्यामुळे गावच्या जलस्रोतांची पातळी खालावली आहे.

येथील शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी खडकवासला कालव्यावर अवलंबून राहावे लागते. कालव्याला पाणी आल्यानंतर शेटफळगढे गावासह तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो.

मात्र, सध्या जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांसह गावकऱ्यांना लागली आहे जोरदार पाऊस नसल्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीची पाणीपातळी जेमतेम आहे त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.

गावात बारामती अॅग्रोच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कालव्याला पाणी येऊन गेल्यामुळे तरी एकाच टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र कालव्याला पाणी येण्यापूर्वी दररोज दोन खेपा कराव्या लागत होत्या - एन.व्ही.गर्जे _ ग्रामसेवक शेटफळगढे (ता इंदापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT