Kharif Season Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Season : पिकांच्या उत्पादनात ८० टक्क्यापर्यंत घटीचा अंदाज

Kharif Crop Production : नगर जिल्ह्यात यंदा सुरुवातीलाच लवकरच पाऊस आला नाही. त्यानंतर उशिराने आलेल्या पावसावर पेरण्या झाल्या. मात्र त्यानंतरही पुरेसा पाऊस झालेला नाही.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : पावसाळा सुरू झाल्यापासून पुरेसा पाऊस नाही. साधारण वीस-पंचवीस दिवसांपासून पावसाचा खंड असल्याने पिकांची वाढ खुंटली, नुकसान झाले.

त्यामुळे गेल्या सात वर्षांतील उत्पादनाच्या सरासरीत पन्नास टक्क्यांच्या आत उत्पादन निघण्याचा अंदाज प्रशासनाने सर्वेक्षणातून स्पष्ट झाला.

त्यामुळे नियमानुसार संबंधित मंडलातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पंचवीस टक्के अग्रिम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी विमा कंपनीला दिले आहे.

नगर जिल्ह्यात यंदा सुरुवातीलाच लवकरच पाऊस आला नाही. त्यानंतर उशिराने आलेल्या पावसावर पेरण्या झाल्या. मात्र त्यानंतरही पुरेसा पाऊस झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. ९५ महसूल मंडलांपैकी सुमारे ७० महसूल मंडलांत २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे. यंदा नगर

जिल्ह्यातील सुमारे ११ लाख शेतकऱ्यांनी खरिपातील पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. प्रतिकूल परिस्थितीत पूर, पावसातील खंड, दुष्काळ, किड व रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी बाबींमुळे अधिसूचित महसूल मंडळ, महसूल मंडळ गट, तालुक्यात शेतकऱ्यांच्या चालू वर्षाच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गत सात वर्षांच्या सरासरीतील उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्के जास्त घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती याबाबत आदेश निर्गमित करू शकते. नगर

जिल्ह्यात प्रशासन, कृषी विभागाने खरिपातील भुईमूग, कापूस, मका, बाजरी, तूर, सोयाबीन, भात, उडीद, मूग, कांदा ही पिके विमा योजनेसाठी जे मंडळे अधिसूचित केलेली आहेत, तेथे एकूण पेरणी क्षेत्राच्या पाच टक्के पिकांचे सर्वेक्षण करून गेल्या सात वर्षांतील उत्पादनाच्या सरासरीत पन्नास टक्क्यांच्या आत उत्पादन निघण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

प्रशासनाने सर्वेक्षणातून स्पष्ट झाल्यानंतर . त्यामुळे नियमानुसार संबंधित मंडलातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पंचवीस टक्के अग्रिम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी विमा कंपनीला दिले आहे.

ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे, त्या शेतकऱ्यांनी ही अगाऊ रक्कम मिळणार आहे. प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणातील बाबी पाहिल्या तर बहुतांश पिकांच्या उत्पादनात ७० ते ८० टक्के घट येण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदाचा खरीप पावसाअभावी वाया गेल्यात जमा आहे.

भरपाईचे आदेश दिलेल्या पीकनिहाय मंडलाची संख्या

भुईमूग ४८

कापूस ५६

मका ७

बाजरी ७५

तूर ५८

सोयाबीन ५७

भात १

उडीद ११

मूग ४३

कांदा ९

नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड आहे. त्यामुळे पिकांची वाढ झालेली नाही. त्याचा फटका उत्पादनाला बसला आहे. जी पिके पीकविम्यासाठी अधिसूचित केलेली आहेत. त्या मंडलातील एकूण पेरणी झालेल्या पिकांच्या पाच टक्के पिकांचे सर्वेक्षण केलेले असून, त्यात गेल्या सात वर्षांच्या तुलनेत यंदा पन्नास टक्क्यांच्या आत उत्पादन निघणार असल्याचा अंदाज स्पष्ट झाल्याने नियमानुसार पीकविम्याचे पंचवीस टक्के अग्रिम रक्कम देण्याबाबत आदेश दिले आहेत.
- सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा

Agricultural College Camp: दर्जी बोरगावमध्ये कृषी महाविद्यालयाचे शिबीर

Wildlife Conflict: शेतांत हत्तींचा कळप ठाण मांडून

Ujani Dam Hunger Strike: उजनी धरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Silk Village Project: लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक रेशीमयुक्त गाव निर्माण करणार

SCROLL FOR NEXT