Banana Market Agrowon
ताज्या बातम्या

Banana Market : कांदेबाग केळीचे दर टिकून राहण्याचा अंदाज

Banana Rate : आगाप काढणीला वेग; दर ८०० ते १८०० रुपये

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Banana : जळगाव : खानदेशात आगाप कांदेबाग केळी पिकातून काढणी सुरू आहे. यंदा केळी काढणीच्या दिवसांमध्ये सणासुदीचे दिवस असल्याने उठाव कायम राहील. शिवाय कांदेबाग केळीची आवक खानदेशात कमी असते. यामुळे दर टिकून राहतील, अशी स्थिती आहे.
केळीचे दर मागील महिनाभरापासून टिकून आहेत. कारण आवक कमी आहे. पिलबाग (खोडवा) व जुनारी (काढणी ९० टक्के पूर्ण झालेल्या बागा) केळी बागांमधून रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबार व धुळ्यातून आवक कमी झाली आहे.

पुढे सणासुदीचे दिवस असून, दर्जेदार कांदेबाग केळीला उठाव असणार आहे. यंदा जुलैतही परदेशात केळीची निर्यात सुरू असल्यामुळे दरात फारशी पडझड झाली नाही. पौष्टिक फळ म्हणून केळीला ग्राहकांकडून कायम मागणी आहे. केळीची निर्यातही अद्याप सुरू आहे. सध्या स्थानिक किंवा राज्यातील विविध भागांत पाठवणुकीच्या केळीचे दर ८०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. किमान दर ८०० रुपयांवरच आहेत. केळीला उठाव कायम आहे. सध्या खानदेशात पिलबाग, जुनारी केळीमधील आवक प्रतिदिन ९० ते ९५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी आहे. ही काढणी पूर्ण होत आली आहे. फक्त उशिरा लागवडीच्या नवती बागांमधून रावेर, यावल, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, अक्कलकुवा भागात काढणी सुरू आहे.

लवकरच श्रावण महिना येणार आहे. तसेच गौरी, गणपती, नवरात्रोत्सव, लागलीच दसरा व दिवाळीचा सण असणार आहेत. या सणासुदीला धार्मिक बाबींमध्ये केळीची मागणी असते. शिवाय परराज्यात दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, काश्मिरातही केळीला उठाव आहे. यामुळे पुढील दोन ते अडीच महिने केळीचे दर टिकून राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सध्या आगाप कांदेबाग केळी पिकातून केळीची काढणी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, पाचोरा भागात ही काढणी सुरू आहे. धुळ्यातील शिरपुरातही आगाप कांदेबाग केळी पिकात काढणी सुरू आहे. केळीचे आगार म्हणून ओळख असलेल्या रावेर, यावल, मुक्ताईनगर या भागांत पुढील अडीच महिने केळीची आवक कमी राहणार आहे. या भागात कांदेबाग केळीचे उत्पादन अपवादाने घेतले जाते. यामुळे केळीचा पुरवठा कमी व मागणी अधिक, अशी स्थिती ऑगस्टअखेरिस तयार होऊ शकते, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT