Coal Mine Agrowon
ताज्या बातम्या

Coal Mining: प्रस्तावित कोळसा खाणीला पर्यावरण मंजुरी

रायगड जिल्ह्यातील घरगोंडा तहसील अंतर्गत गरेपालमा-२ हा कोळसा ब्लॉक असून या खाणीतून कोळसा थेट रेल्वे मार्गे महानिर्मितीच्या चंद्रपूर, कोराडी आणि परळी वीज केंद्राला पाठविला जाणार आहे.

ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूरः केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि वातावरण बदल मंत्रालयाने महानिर्मितीच्या छत्तीसगड येथील गरेपालमा-२ प्रस्तावित कोळसा खाणीला (Coal Mine) पर्यावरण मंजुरी दिली आहे.

सुमारे २५८३.४८ हेक्टर परिसरातील या कोळसा ब्लॉकची क्षमता २२ दशलक्ष मेट्रिक टन प्रतीवर्ष खुल्या खाणीतून तर १.६ दशलक्ष मेट्रिक टन प्रतीवर्ष भूमिगत खदाणीची आहे. रायगड जिल्ह्यातील घरगोंडा तहसील अंतर्गत गरेपालमा-२ हा कोळसा ब्लॉक असून या खाणीतून कोळसा थेट रेल्वे मार्गे महानिर्मितीच्या चंद्रपूर, कोराडी आणि परळी वीज केंद्राला पाठविला जाणार आहे.

त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येकी ५०० मेगावॉट क्षमतेच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र संच क्रमांक ८ व ९ (१००० मेगावॉट), कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रत्येकी ६६० मेगावॉट क्षमतेच्या संच क्रमांक ८,९ व १० (१९८० मेगावॉट) आणि परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगावॉट क्षमतेच्या संच क्रमांक ८ (२५० मेगावॉट) असे एकूण ३२३० मेगावॉट क्षमतेच्या वीज उत्पादनासाठी या कोळशाचा वापर होणार आहे.

या प्रकल्पाद्वारे सुमारे ३४०० रोजगाराच्या संधी (Employment Generation) उपलब्ध होणार आहेत. या कोळसा प्रकल्पाची पर्यावरण विषयक जनसुनावणी सप्टेंबर २०१९ मध्ये झाली असून वन मंजुरी टप्पा-१ आणि पर्यावरण मंजुरी प्राप्त झाली आहे. आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत वन मंजुरी टप्पा-२ अपेक्षित आहे. त्यानंतर जमीन अधिग्रहण प्रक्रियेला सुरुवात होणार असून साधारणतः: सन २०२३ मध्ये प्रत्यक्ष खाण उत्खननास प्रारंभ होईल असे महानिर्मितीकडून सांगण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Unseasonal Rain: उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; राज्यात कोकण वगळता वादळी पावसाचा इशारा

Vidarbha Irrigation Projects: विदर्भातील ५ सिंचन प्रकल्पांची कामे भूसंपादनाअभावी प्रलंबित- गिरीश महाजन

Wheat and Chana Harvesting: खानदेशात गहू, हरभरा काढणीस वेग

Disaster Compensation: नुकसान भरपाईसाठी राष्ट्रीय आपत्तीचे निकष लावा

Education Support: ‘महाबीज’तर्फे दहा शाळांना ग्रंथसाहित्य भेट

SCROLL FOR NEXT