Agriculture Drone Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Drone : ड्रोन प्रशिक्षणातून ‘कृषी’त मिळणार रोजगाराच्या संधी ः डॉ. गोरंटीवार

केंद्र सरकारच्या नागरी विमान उड्डयण महासंचालनालयाच्या रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्रा अंतर्गत रिमोट पायलट (ड्रोन) प्रशिक्षणाअंतर्गत प्रथम बॅचचे प्रशिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू झाले आहे.

टीम ॲग्रोवन

नगर ः केंद्र सरकारच्या नागरी विमान उड्डयण महासंचालनालयाच्या रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्रा अंतर्गत रिमोट पायलट (Drone Pilot Training) (ड्रोन) प्रशिक्षणाअंतर्गत प्रथम बॅचचे प्रशिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठात ()MPKV सुरू झाले आहे. ‘‘या प्रशिक्षणामुळे युवा पिढीला कृषी क्षेत्रात (Agriculture Sector) नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,’’ अशी माहिती या वेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी दिली.

विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. सचिन नलावडे, डॉ. सुनील कदम यांच्या उपस्थितीत ड्रोन प्रशिक्षणाचे उद्‍घाटन करण्यात आले.या प्रशिक्षणात अमरावती, पुणे आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील युवकांनी सहभाग घेतला आहे. डॉ. सचिन नलावडे व मुंबई येथील ग्राउंड झिरो एरोस्पेसचे राहुल आंबेगावकर, ध्रिती शहा हे तज्ज्ञ प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करीत आहेत.

जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्लीतर्फे राहुरी येथे हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पा अंतर्गत ‘शेतीसाठी ड्रोनचा वापर’ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा झाली. या वेळी डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, आयोजक डॉ. सचिन नलावडे, कास्ट प्रकल्पाचे सहप्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Animal : गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा विचार नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट

Crop Insurance: पीकविमा परतावा मंजुरीत लोहा, कंधारला ठेंगा

Cultural Heritage: छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे स्मारक प्रेरणादायी असेल; राम शिंदे

Wild Vegetables: रानभाज्यांना मिळाली बाजारपेठ

Artificial Sand: कृत्रिम वाळू धोरणासाठी जिल्ह्यात आराखडा तयार

SCROLL FOR NEXT