ताज्या बातम्या

Digitization : डिजिटल दस्तऐवज संकल्पनेवर भर दया

महाराजस्व अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सामाजिक न्याय भवन येथे ४८४ गावांचे डिजिटल नकाशे वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

टीम ॲग्रोवन

वर्धा : गाव नकाशे अतिशय महत्त्वाचा दस्ताऐवज (Digital Document) आहे. जिल्हा महसूल प्रशासनाने हे नकाशे डिजिटल (Digital Map) स्वरूपात करून अतिशय चांगले काम केले आहे. यामुळे पुढील किमान ५० वर्षे संबंधित गावांना नकाशे परत काढावे लागणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या सहसचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले.

महाराजस्व अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सामाजिक न्याय भवन येथे ४८४ गावांचे डिजिटल नकाशे वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, अप्पर जिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. गाव नकाशे व सातबारा डिजिटल होणे अत्यावश्यक आहे. महसूल विभागाने गेल्या काही दिवसात याबाबतीत चांगले काम केले आहे. त्यामुळे मालमत्ता धारक सर्वसामान्य नागरिक व शेतक-यांना याचा फायदा होणार असल्याचे पुढे बोलताना श्रीमती लवंगारे यांनी सांगितले.

महाराजस्व अभियानांतर्गत जिल्हयात दस्ताऐवज संगणकीकरणाचे भरीव काम झाले असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी यावेळी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ४८४ गावांतील तलाठ्यांना डिजिटल गाव नकाशाची लॅमिनेशन केलेली प्रत वितरित करण्यात आली. या गावांचे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी नकाशे स्वीकारले. बँक ऑफ इंडियाच्या सामाजिक दायित्व निधीतून डिजिटल नकाशे तयार करण्यात आले. यासाठी या बँकेने ७ लाख रुपयाचे अर्थसाहाय्य केले. याबद्दल यावेळी जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक वैभव लहाने यांना प्रशासनाच्या वतीने आभार पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत २२ टक्के कपाशी क्षेत्र घटले

Cotton Disease : कपाशीवर वाढतोय टोबॅको स्ट्रीक विषाणूंचा प्रादुर्भाव

Wire Fencing Scheme: शेताला तार कुंपनासाठी मिळणार ९० टक्क्यांपर्यंत अनुदान

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचा शिवनेरीवर संकल्प; आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच

Ganesh Festival Konkan : माटीच्या फळाफुलांची कोट्यवधींची उलाढाल

SCROLL FOR NEXT