Farming Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Crop Management : आपत्कालीन पीक व्यवस्थापन

Kharif Season : खरीप हंगामाबाबत सल्ला

Team Agrowon

Emergency Crop Planning : रांजणगाव सांडस, ता. ४ : 'खरीप हंगाम (Kharif Season) सुरू होऊन महिना उलटला तरी जिल्ह्यातील काही तालुक्यात व शिरूर तालुक्यात पावसाअभावी शेतीची कामे खोळंबून आहेत.

खरिपातील महत्त्वाची पिके बाजरी, मुग, उडीद, सोयाबीन, ऊस, कांदा, भुईमूग आदींच्या पेरण्या अजूनही झाल्या नाहीत.

यामुळे हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशा वेळी हंगाम वाया जाऊ नये यासाठी आपत्कालीन पीक व्यवस्थापन करावे,' असे मत कृषी विद्यावेत्ता संतोष सुतार यांनी व्यक्त केले.

पावसाला उशिरा सुरवात झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत शेतीची कामे, पिकांचे नियोजन आणि पेरणीच्या अनुषंगाने बदल करणे आवश्‍यक आहे.

जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पाऊस लांबल्यास खरीप ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, सूर्यफूल पिके घ्यावीत. अशा परिस्थितीत मूग, उडीद यांसारखी पिके योग्य ठरत नाहीत.

कृषी विद्यापीठामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी पीक नियोजन शिफारशी दिल्या आहेत, असे मत कृषी विद्यावेत्ता संतोष सुतार यांनी 'सकाळ'च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

१. नियमित पावसाळा चार आठवड्यांपेक्षा जास्त उशिराने सुरू झाल्यास (१६ ते २२ जुलै) खालील प्रकारे नियोजन करावे.
* साधारणत: २० ते २५ टक्के अधिक बियाण्यांचा वापर करावा. रासायनिक खतांच्या वापरात २५ टक्केच करावा.
* ज्वारीवर खोडमाशी/खोड पोखरणारी अळी यांचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता वेळेवर प्रतिबंधात्मक उपाय करावा
* प्रादुर्भाव दिसून येताच त्वरित उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.
* मूग, उडीद पिकांची पेरणी शक्‍यतो कमी म्हणजे केवळ नापेर क्षेत्रावर करावी

२. पावसाळा पाच आठवड्यांपेक्षा जास्त उशिराने सुरू झाल्यास (२३ ते २९जुलै)
* काही क्षेत्रावर ज्वारी घ्यावयाची असल्यास बियाण्यांचा दर ३० टक्‍क्‍यांनी वाढवावा.
* ज्वारीमध्ये खोड माशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता गृहीत धरून नियंत्रणासाठी उपाययोजना तयार ठेवावी.
* ज्वारीमध्ये तीन किंवा सहा ओळीनंतर तुरीचे पीक घेतल्यास हंगामाची जोखीम कमी होते.
* सोयाबीन पिकाची पेरणी २५ जुलैपर्यंतच करावी. पेरणीसाठी स्वत:जवळचे बियाणे वापरावे.
* सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घ्यावे. या वेळी सोयाबीनच्या ओळींची संख्या कमी करावी.
* मूग व उडीद पिकांची पेरणी अजिबात करू नये.

३. त्यापेक्षा विलंबाने सुरू होणाऱ्या पर्जन्य परिस्थितीसाठी...
* पीक उत्पादनातील जोखीम कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करा
* मजूर कमतरता लक्षात घेता मूलस्थानी जलसंधारणासाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करावा
* कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमांतर्गत अनुदानावर यंत्राची उपलब्धता केली जाते
* पिकांच्या संवेदनशील अवस्थेत पाणीपुरवठा करण्यासाठी शेततळे निर्मिती करण्याकडे लक्ष द्यावे.
* पिकास पाणी द्यावे. कृषी विद्यापीठांनी दिलेल्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांनी पीक नियोजन करावे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Energy: अमरावती जिल्ह्यात घरकुलांमध्ये मिळणार सौर ऊर्जेचा लाभ

Crop Insurance: सरासरी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Flaxseed Farming: धान उत्पादक चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची जवसाला पसंती

Summer Moong Crop: कमी कालावधीत येणारे उन्हाळी मुगाचे ९ वाण

Soybean Procurement: सांगलीत दोन केंद्रांवर सतराशे क्विंटल सोयाबीन खरेदी

SCROLL FOR NEXT