Cotton &Soybean Agrowon
ताज्या बातम्या

Soybean-cotton farmers : बुलडाण्यात आज एल्गार मोर्चा

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी आणि शेतमजुरांच्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी रविवारी (ता. ६) येथे एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

बुलडाणा : सोयाबीन-कापूस उत्पादक (Soybean Cotton Farmer) शेतकरी आणि शेतमजुरांच्या (Agriculture Labor) न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी रविवारी (ता. ६) येथे एल्गार मोर्चाचे (Elgar Morcha) आयोजन करण्यात आले आहे. रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून या मोर्चासाठी जिल्हाभर जनजागृती केली जात आहे. या मोर्चात पुढील आंदोलनाची कोणती घोषणा केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोयाबीन-कापसाच्या भावासह इतर मागण्यांसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. तुपकरांनी जिल्हाभरात गावोगावी बैठका, सभा घेऊन वातावरण तयार केले आहे.

जिल्हाभरातून युवक, शेतकरी तसेच महिला उत्स्फूर्तपणे आणि स्वयंस्फूर्तीने या मोर्चात सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षी ३१ ऑक्टोंबर रोजी बुलडाण्यात एल्गार मोर्चा निघाला होता. त्यानंतर तुपकरांनी अन्नत्याग आंदोलनही केले होते. राज्यभर आंदोलनाचा भडका उडाल्यानंतर राज्य सरकारने काही मागण्या मान्य केल्या होत्या.

सोयाबीनला ८ हजार तर कापसाला १२ हजारांपर्यंत भाव मिळाला होता. पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, पोलिस कर्मचारी, वाहतूक पोलिस, महिला पोलिस कर्मचारी, राखीव पोलिस दलाच्या तुकड्या, दंगा काबू पथक असा बंदोबस्त मोर्चाच्या निमित्ताने तैणात केला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Congress Campaign: परवडणाऱ्या घरांसाठी काँग्रेसचे अभियान

Fadnavis Relief Package: फडणवीसांचे सरकारी पॅकेज म्हणजे फक्त आकड्यांची हेराफेरी

Farmer Dues Issue: भात उत्पादकांना प्रतीक्षा १८२ कोटींच्या चुकाऱ्यांची

Farmer Relief: पॅकेज अंमलबजावणीच्या जबाबदाऱ्या निश्‍चित

Grape Farming: कडवंचीचे द्राक्ष आगार ‘जर-तर’च्या फेऱ्यात

SCROLL FOR NEXT