Co operative Societies Election agrowon
ताज्या बातम्या

Co operative Societies Election : कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांसह तब्बल २ हजार सहकारी संस्थांचा धूरळा उडणार

sandeep Shirguppe

Kolhapur Election News : मागच्या तीन महिन्यापूर्वी पावसाचे कारण देत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ३० सप्टेंबरपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. दरम्यान यावर आदेश देत ९ ऑक्टोबरपासून निवडणुक प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी कळविले आहे.

राज्यासह अनेक जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील लहान मोठ्या संस्था मिळून दोन हजार सहकारी संस्थांची रणधुमाळी सुरू होणार आहे. 'बिद्री', 'भोगावती', 'आजरा' या साखर कारखान्यांसह 'वारणा', ‘महालक्ष्मी' बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.

मागच्या वर्षी ऑक्टोबर २०२२ पासून सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षभरात विकास संस्था वगळता इतर वर्गवारीतील संस्थांच्या निवडणुका फारशा झालेल्या नाहीत. एप्रिलनंतर गती आली पण पावसाळ्याचे कारण पुढे करत २८ जून २०२३ रोजी निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या होत्या.

दरम्यान ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात सुट्या आल्याने प्राधिकरणाने निर्णय घेतला नव्हता, काल(ता.०३) याबाबत आदेश देण्यात आला. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचा दोन साखर कारखान्यांच्या निवडणुका लागल्या आहेत. यामध्ये बिद्री साखर कारखान्यासाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

तर भोगावती सहकारी साखर कारखान्याची छाननी प्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे. 'भोगावती' व 'आजरा' साखर कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांची नियुक्ती केली आहे. तर बिद्री'ची जबाबदारी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्यावर सोपवली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळच्या माध्यमातून सहकारी दूध संस्थाचे जाळे मोठ्या प्रमाणात असल्याने जवळपासून १९१० दूध संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या दोन हजार संस्थांपैकी १९१० संस्था या दुग्ध विभागाच्या आहेत. ही प्रक्रिया राबवताना या विभागाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT