मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा आज माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते राजभवन येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते. शिवसेनेचे आमदार, भाजपचा विधीमंडळ गट आणि १६ अपक्ष असे समर्थन या सरकारला असेल, आज संध्याकाळी राज्यपालांनी 7:30 वाजता एकनाथ शिंदे यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे." असेही यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सेना एकत्र लढली. एकूण १७० लोक निवडून आले होते. साहजिक अपेक्षा होती, भाजप सेना सरकार येईल. त्यावेळीच मुख्यमंत्री भाजपचा (BJP) असणार होता. मात्र निकालांनंतर आमचे मित्रांन , शिवसेना नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली. बाळासाहेबांनी ज्यांचा आजन्म विरोध केला. सावरकरांचा विरोध केला, अशा काँग्रेस राष्ट्रीवादीसोबत युती केली. भाजपला बाहेर ठेवणे हा जनमताचा अपमान होता. जनमत हे भाजप-सेना युतीला होते." असेही फडवणीस यावेळी म्हणाले.
मी बाहेर राहून सरकार टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासनही फडवणीस यांनी दिले.
"गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीच्या माध्यमातून अडीच वर्षांत कोणतीही विकास नाही, नवी योजना नाही. प्रचंड भ्रष्टाचार झाला. महाराष्ट्राच्या इतिहासात दोन मंत्री मनी लॉन्डरिंग प्रकरणी जेलमध्ये जाणे ही खेदजनक बाब होती. ठाकरेंनी दाऊद इब्राहिमला विरोध केला. त्याच्याशी संबंध असण्याचा आरोप असणारा मंत्री जेलमध्ये गेला तरी राजीनामा नाही.
शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आहेत. शिवसेनेच्या आमदारांच्या कुचंबणा होत होती. ज्यांच्याविरोधात लढलो त्यांच्यासोबतच सत्ता स्थापन हाळी. या कुचंबणेमुळे त्यांनी बंड केले. या आमदारांपेक्षा ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांना महत्व दिले. अशी टिपणी फडवणीस यांनी केली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. सेनेचे दोन तृतियांशपेक्षा जास्त आमदार माझ्यासोबत आहेत. महाविकास आघाडीत असताना आम्हाला खूप अडचणी आल्या, निर्णय घेता येत नव्हते. पण आता बाळासाहेबांचा विचार आम्ही पुढे नेणार आहोत.
शिवसेनेचे ४० आणि अपक्ष १० असे एकूण ५० आमदार माझ्यासोबत आहेत. आम्हाला काही स्वार्थ नाही, पदाची लालसा नाही. ही वैचारिक लढाई आहे, बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचा वारसा आम्ही चालवणार असल्याचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.
संख्याबळाचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हेही मुख्यमंत्री होऊ शकले असते, मात्र त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत बाळासाहेबांच्या शिवसैनिकालाच मुख्यमंत्रीपदी बसवण्याचे काम केले.
अर्थात ते स्वतः मंत्रिमंडळात नसले राज्याच्या विकासासाठी ते आपल्यासोबत आहेत. फडणवीस हा फार मोठ्या मनाचा माणूस आहे. स्वतःला मिळत असलेले दुसऱ्याला देण्याची तयारी कोणी दाखवत नाही. माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला त्यांनी राज्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली. हा विश्वास जपण्याचा प्रयत्न आपण करू, असेही शिंदे म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.