Gram Panchayats Election Agrowon
ताज्या बातम्या

Gram Panchayat Election : परभणीतील आठ ग्रामपंचायती बिनविरोध

परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णतः बिनविरोध झाली अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.

टीम ॲग्रोवन

परभणी : परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींची निवडणूक (Gram Panchayat Election) पूर्णतः बिनविरोध झाली अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. त्यामुळे आता ११९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता. १८) मतदान (Voting) घेण्यात येईल तर मंगळवारी (ता. २०) मतमोजणी (Vote Counting) होऊन निकाल जाहीर केले जातील.

परभणी जिल्ह्यातील ऑक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या नऊ तालुक्यांतील १२७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ६८० उमेदवारी अर्ज तर सदस्यांच्या १०९० जागांसाठी २९७९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

बुधवार (ता. ७) नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानंतर परभणी तालुक्यातील : इटलापूर (दे.), पिंपरी देशमुख, जिंतूर तालुका: डिग्रस, मानवत तालुका: सोनुळा, पाथरी तालुका : गोपेगाव, गंगाखेड तालुका : भांबरवाडी, पूर्णा तालुका : मुंबर, गोविंदपूर या ८ ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णतः बिनविरोध झाली असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित ग्रामपंचायतीमधील काही जागांची बिनविरोध निवड झाली‌ असे सुत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Akola Agriculture University: विकसित भारताचा मार्ग कृषी क्षेत्रातून विस्तारतो

Sugarcane Rate Issue: ऊसदर जाहीर करा; अन्यथा मुक्काम आंदोलन

Ativrushti Madat: अतिवृष्टिग्रस्तांसाठी २५४० कोटी मदत

Banana Price: आवक घटल्याने खानदेशात केळी दर स्थिर

Maharashtra Politics: निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात

SCROLL FOR NEXT