River Pollution
River Pollution  Agrowon
ताज्या बातम्या

River Pollution : नदी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत

Team Agrowon

सोलापूर ः आगामी काळात नदी प्रदूषणामुळे (River Pollution) गंभीर आजाराचा सामना करावा लागणार आहे. सध्या जिल्ह्यात प्रदूषित पाण्यामुळे (Water Pollution) नागरिकांचे व जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी प्रशासनातील प्रमुख घटकांनी या विषयाला प्राधान्य देऊन नदी प्रदूषण हटविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येथे दिल्या.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘चला जाणूया नदीला’ अभियानासंदर्भात जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीस लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, उपजिल्हाधिकारी चारूशीला देशमुख-मोहिते, उपवनसंरक्षक धैयशील पाटील, राज्य समन्वयक डॉ. सुमंत पांडे, क्षेत्रीय समन्वयक अधिकारी सर्वश्री आर. पी. मोरे, श्री. जाधवर, श्री. वाडकर, श्री. हरसुरे, अण्णा कदम, नदी समन्वयक सर्वश्री वैजनाथ घोंगडे, रजनीश जोशी, डॉ. अनिल पेठकर, सूर्यकांत बनकर उपस्थित होते.

‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील कासाळगंगा, भीमा, कोरडा, आदिला, दुबदुबी आणि माणगंगा नद्यांचा समावेश आहे. या नद्यांना प्रदूषित करणारी स्थळे निश्‍चित करा. दोषींना नोटिसा द्याव्यात, असे निर्देश श्री. शंभरकर यांनी यावेळी दिले.

या वेळी शंभरकर यांनी समितीच्या सदस्यांची मते जाणून घेतली व आवश्यक सूचना केल्या. नदी संवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी, त्यामध्ये अधिकाधिक लोकसहभाग मिळवण्यासाठी, तसेच काही महत्त्वाचे बदलही सुचविले. बैठकीत समन्वयक अधिकारी यांनी नदीनिहाय नदी संवाद यात्रेचे सादरीकरण केले.

नोडल अधिकारी नेमणार...

आदिला नदीचा उगम उस्मानाबाद जिल्ह्यातून होत आहे. आदिला नदीचा प्रवाह उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांतून होत आहे. त्यासाठी संबंधित गावांतील नागरिकांचा देखील या मोहिमेत सहभाग आवश्यक आहे. यासाठी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येईल, असे श्री. शंभरकर म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

SCROLL FOR NEXT