Maharashtra Weather Update महाराष्ट्रातील हवेचा दाब १०१२ हेप्टापास्कल, तर पूर्व भागावर १०१४ हेप्टापास्कळ इतका मंगळवार (ता. १४) पर्यंत राहील. तोपर्यंत सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडी (Cold Weather) जाणवेल.
बुधवारी (ता. १५) महाराष्ट्रावर हवेचे दाब (Air Pressure) १०१० हेप्टापास्कल इतके होताच, सकाळी व रात्रीचे थंडीचे प्रमाण अत्यंत प्रमाणात कमी होईल. दुपारच्या वेळी उष्ण हवामान जाणवेल. हीच स्थिती गुरुवारी (ता. १६) देखील जाणवेल.
मात्र शुक्रवार (ता. १७)पासून थंडीचे (Cold) प्राबल्य पुर्णतः कमी होईल. त्या वेळी दक्षिण आणि उत्तर भारतातसह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण कमी होईल. बुधवार (ता.१५)पासून खऱ्या अर्थाने उन्हाळी हंगाम (Summer Season) सुरू होईल.
सूर्याच्या उत्तरायणामुळे हवामान बदलेल. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढेल. या आठवड्यात कोकणात कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. वाऱ्याचा वेग प्रति दिन ७ ते ८ किमी राहील.
वाऱ्याची दिशा महाराष्ट्रात ईशान्येकडून राहील. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी होईल. हवामान अत्यंत कोरडे राहील.
अरबी समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २५ अंश सेल्सिअस, तर बंगालचे उपसागराचे तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २७ अंश सेल्सिअस, तर प्रशांत महासागराचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअस राहील.
कोकण ः
कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४० टक्के, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३३ ते ३७ टक्के राहील.
दुपारची सापेक्ष सर्वच जिल्ह्यांत १५ ते १७ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र ः
कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस तर जळगाव जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशतः निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २२ ते २५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते १२ टक्के राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. हवामान कोरडे राहील.
मराठवाडा ः
कमाल तापमान उस्मानाबाद, लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस, तर नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील.
हवामान अत्यंत कोरडे राहील. किमान तापमान उस्मानाबाद जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, लातूर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, तर नांदेड व बीड जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रतेत घट होईल.
सकाळची सापेक्ष आर्द्रता औरंगाबाद जिल्ह्यात २५ टक्के, तर उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २० ते २२ टक्के राहील. त्यामुळे सकाळी हवामान अत्यंत कोरडे राहील.
दुपारची सापेक्ष आर्द्रता नांदेड जिल्ह्यात केवळ ७ टक्के, तर परभणी जिल्ह्यात ९ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता १२ ते १६ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १६ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ ः
कमाल तापमान बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.
सकाळची सापेक्ष आद्रता अमरावती जिल्ह्यात ३१ टक्के, तर उर्वरीत जिल्ह्यांत २४ ते २७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते ९ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १२ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.
मध्य विदर्भ ः
कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर वर्धा जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, नागपूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १३ ते १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता २४ ते ३० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता वर्धा व नागपूर जिल्ह्यात १४ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यात ९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १४ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.
पूर्व विदर्भ ः
कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस, तर गोंदिया जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३२ ते ३३ टक्के, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २६ ते २९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते १२ टक्के इतकी कमी राहील.
त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १३ किमी आणि वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र ः
कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, तर सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान पुणे जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, सोलापूर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस आणि नगर जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता २० ते २७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता पुणे व नगर जिल्ह्यांत केवळ ८ टक्के, सोलापूर जिल्ह्यात ९ टक्के, तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत १० ते ११ टक्के राहील.
वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर जिल्ह्यात ताशी १४ किमी, तर उर्वरित जिल्ह्यांत ८ ते १२ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
कृषी सल्ला ः
- सुरू ऊस, उन्हाळी भुईमुगाची लागवड १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी.
- चाऱ्यासाठी आफ्रिकन टॉल मक्याची पेरणी करावी.
- उन्हाळी हंगामासाठी कलिंगड, खरबुजाची लागवड करावी.
- उन्हाळी मुगाची पेरणी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.