Sugar Mill Agrowon
ताज्या बातम्या

Cooperative Sugar Mill : ‘सहकार शिरोमणी’, ‘मकाई’च्या निकालाची उत्सुकता शिगेला

Cooperative Sugar Mill Election : सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांना विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आव्हान दिले आहे.

Team Agrowon

Solapur News : भाळवणी (ता. पंढरपूर) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यासाठी शुक्रवारी (ता. १६) ९४.४० टक्के तर करमाळ्यातील भिलारवाडी येथील मकाई सहकारी साखर कारखान्यासाठी ५७ टक्के मतदान झाले.

आता या निवडणुकीची मतमोजणी रविवारी (ता. १८) होणार आहे. निवडणुकीच्या आधीपासूनच आरोप-प्रत्यारोपाने चर्चेत आलेल्या या कारखान्यांच्या निवडणूक निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांना विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आव्हान दिले आहे. काळे यांना भगिरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील या युवा नेत्यांनी साथ दिली आहे.

तर अभिजित पाटील यांना प्रा. बी. पी. रोंगे, अॅड. दीपक पवार यांची साथ आहे. कारखान्यावरील कर्ज, शेअर्स या प्रश्नावरून पाटील यांनी काळे यांना लक्ष्य केले. गेली २२ वर्षे काळे यांची कारखान्यावर एकहाती सत्ता आहे, इथे अभिजित पाटील सत्ता परिवर्तन करणार का, याकडे सर्वांचे लागले आहे.

मकाई कारखान्यावर स्थापनेपासून बागल गटाची सत्ता आहे. पण यंदाच्या निवडणुकीत कारखान्याचे विद्यमान चेअरमन दिग्विजय बागल, माजी आमदार शामल बागल वा रश्मी बागल यांच्यापैकी कोणीही निवडणूक रिंगणात नव्हते.

बागल विरोधी गटाकडून प्रा. रामदास झोळ यांनीही बागल गटाला आव्हान दिले. पण ते स्वतःही निवडणूक रिंगणात नाहीत. त्यामुळे नेत्याऐवजी कार्यकर्त्यांमध्ये रंगलेल्या या निवडणुकीकडेही सर्वांच लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT