rainfall Agrowon
ताज्या बातम्या

पाणंद रस्त्यांची अवस्था दयनीय

येथील पाणंद रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात न आल्याने पावसामुळे त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

टीम ॲग्रोवन

शिराळा, अमरावती : येथील पाणंद रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात न आल्याने पावसामुळे (Heavy Rainfall) त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माल घरी आणताना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती (Road Damage) करावी किंवा डांबरीकरण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अमरावती तालुक्याच्या शिराळा परिसरातील अनेक पाणंद रस्ते मातीचे असल्याने पावसाळ्यात त्यांची अवस्था फारच वाईट झाली आहे. परिणामी या रस्त्याने शेतांची मशागत करणे कठीण झाले आहे. शेतात मजुरांसह बैलबंडी घेऊन जाणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे. शिराळा ते खराळा पाणंद रस्त्याचे गेल्या दहा वर्षांपासून मातीकरण करण्यात आले. शिवाय या रस्त्याचे खराळापर्यंत बांधकाम पूर्ण झालेले नाही.

पावसामुळे या रस्त्याने चालताही येत नसल्यामुळे शेतात जाण्यासाठी कमालीची कसरत करावी लागते. यावर्षी अतिवृष्टीमुळे सर्व पाणंद रस्ते जाण्यायोगे राहिले नाहीत. त्यामुळे आपल्या शेतातील पीक घरापर्यंत कसे आणावे, हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या पाणंद रस्त्यावर पूलसुद्धा बांधण्यात आला नाही. त्यामुळे शेतात ये-जा कशी करावी, हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांच्या समस्येची दखल शासनाने तसेच जिल्हाधिकारी, तहसीलदारांनी घेऊन शिराळा ते खराळा पाणंद रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी वासुदेव भोवाळू, मधुकर ढवळे, राजेश भोवाळू, शिवाजी खाडे, अरविंद खाडे, सतीश भोवाळू, अनिल घायर, रवी नावंदर, शरद भोवाळू, प्रवीण इंगळे, अनिकेत खाडे, अरेंद्र खाडे, सागर रोडे, अरविंद भागवत, गंगाधर पंडे, सचिन ठाकरे, रावसाहेब ठाकरे, नामदेव देशमुख, ज्ञानेश्वर वानखडे, अरविंद माकोडे आदींनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: राज्य सरकारचे अतिवृष्टीच्या मदतीचे दर अखेर जाहीर; शासन निर्णय जारी, काय आहेत मदतीचे दर?

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट, अॅव्होकॅडो, मसाला पिकांना ‘एकात्मिक फलोत्पादन’ मधून अनुदान

Jowar Cultivation : अतिवृष्टीमुळे ज्वारीच्या कोठारात हरभरा, करडई

Onion Market : निर्यात धोरणाचा, बाजार हस्तक्षेपाचा कांदा दरावर विपरीत परिणाम

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी तालुकास्तरावर करा

SCROLL FOR NEXT