Paddy Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Cultivation : पुरेशा पावसाअभावी भातरोपे पुनर्लागवडी रखडल्या

Paddy Farming : भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या मुळशी तालुक्यात पाऊस तीन आठवडे उशिरा सुरू झाला.

Team Agrowon

Pune News : भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या मुळशी तालुक्यात पाऊस तीन आठवडे उशिरा सुरू झाला. त्यामुळे भात लावणीचे वेळापत्रक बदलले आहे. पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी भाताची रोपे टाकली. मात्र त्यांच्या पुनर्लागवडीसाठी पुरेसा पाऊस नसल्याने लागवडी रखडल्या आहेत.

दरम्यान, विहिरीसारख्या शाश्‍वत सिंचनाची साधने असलेल्या शेतकऱ्यांनी लागवडी सुरू केल्या आहेत. मुळशीसह भात लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ आणि भोरमध्येही अशीच स्थिती आहे.

तालुक्यात पावसाचे आगमन झाले असले तरी अद्याप शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी ओढे, नद्यांना पूर आला नाही. त्यामुळे खाचरात पुरेसे पाणी होत नाही. शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाताच्या पेरण्या केल्या होत्या.

‘‘पाऊस शेवटच्या आठवड्यात आला. त्यामुळे भात रोपे उगवण्यास उशीर होत आहे. तसेच पुरेशी उगवण न झाल्याने दुबार पेरणीची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे भात लावणीचे वेळापत्रकच बदलले आहे,’’ असे जवळ येथील शेतकरी सुहास घारे यांनी सांगितले.

घारे म्हणाले, ‘‘या वर्षी दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे खाचरांची मशागत झाली नाही. तसेच बारमाही पाण्याची सोय असलेले शेतकरी कमी आहेत. जोरदार पाऊस झाल्याशिवाय शिवारात पाणी होणार नाही. त्यानंतर भात लावणी सुरू होईल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT