Weather Update
Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यात आज कोरड्या हवामानाचा अंदाज

टीम ॲग्रोवन

पुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) (Monsoon Update) उर्वरित महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून परतले आहेत. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात परतीच्या पावसाने दणका (Returning Rain) दिल्यानंतर आता राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. आजपासून (ता. २३) राज्यात हवामान मुख्यतः कोरडे (Dry Weather) राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

अंदमान समुद्रातील अति तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रापासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमा दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यासह संपूर्ण देशातून मॉन्सून परतला असून, राज्यात निरभ्र आकाशासह कोरडे हवामान झाले आहे.

आज (ता. २४) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पहाटे गारठा जाणवू लागला असून, आता गुलाबी थंडीची प्रतीक्षा आहे.

बंगालच्या उपसागरात घोंघावणार चक्रीवादळ

बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. ही अतितीव्र प्रणाली (डीप डिप्रेशन) पोर्ट ब्लेअरपासून ६४० वायव्येकडे, सागर बेटापासून ६७० किलोमीटर, तर बांगलादेशाच्या बरिसाल पासून ८२० किलोमीटर आग्नेयेकडे आहे. आज (ता. २४) उपसागरात चक्रीवादळ घोंघावणार आहे. ही वादळी प्रणाली उत्तरेकडे वळून उद्या (ता. २५) सकाळपर्यंत तिंकोना बेटे आणि सॅण्डवीप जवळ बांगलादेशाच्या किनाऱ्याला धडकण्याचे संकेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

SCROLL FOR NEXT