Agricultural Drone Spraying Agrowon
ताज्या बातम्या

Agricultural Drone Spraying : विषबाधा टाळण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणीचा प्रयोग

ड्रोनच्या माध्यमातून वेळेची बचत आणि शेतकऱ्यांचे कष्ट कमी होणार आहेत.

Team Agrowon

यवतमाळ : शेती क्षेत्रात यांत्रिकीकरणाला चालना दिली जात आहे. शेतीत गेल्या काही वर्षांपासून मनुष्यबळ कमी झाले आहे. त्याचाच विचार करता आता फवारणीसाठी ड्रोनचा वापर केला (Agricultural Drone spraying) जाणार आहे.

फवारणीतून होणारी विषबाधा, फवारणीला (spraying) लागणार खर्च, मनुष्यबळाचा अभाव टाळण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राकडून (Agricultural Science Center) यशस्वी प्रयोग केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतात ड्रोनच्या (Drone) माध्यमातून फवारणी केली जाणार आहे.

ड्रोनच्या माध्यमातून वेळेची बचत आणि शेतकऱ्यांचे कष्ट कमी होणार आहेत. ड्रोनच्या माध्यमातून सात मिनिटांत एक एकरावर फवारणी करणे शक्य असल्याचा दावा कृषी विज्ञान केंद्राने केला आहे.

जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी कापसावरील बोंडअळी नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी केली. यात शेतकरी तसेच शेतमजुरांना विषबाधा झाली.

त्याचे परिणाम जिल्ह्यात अजूनही अनुभवयास मिळतात. शिवाय गेल्या काही काळात मनुष्यबळही कमी झाले आहे. त्याचा परिणाम वेळेवर होत आहे. वेळेत फवारणी केली जात नाही.

परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. विषबाधा होऊ नये, म्हणून सुरक्षाकिटचा पर्याय समोर आला होता. मात्र, सुरक्षाकिट घालून फवारणी शक्य नव्हती.

यावर पर्याय म्हणून कृषी विज्ञान केंद्राने ड्रोनचा पर्याय समोर आणला आहे. केंद्र शासनानेही यांत्रिकीकरणाला गती देण्याचे धोरण आखले आहे. यातून कृषी विज्ञान केंद्राला ड्रोन देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करावी यासाठी कृषी विज्ञान केंद्रातर्फे प्रात्याक्षिक सुरू झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. ड्रोनच्या माध्यमातून कमी वेळेत जास्त काम होत आहे. शिवाय, विषबाधेचे प्रमाण कमी झाले आहे.

शेतीला आधुनिकीकरणाचा जोड आवश्यक आहे, त्यासाठी सध्या शेती व्यवसायात अत्याधुनिक यंत्राच्या वापरावर भर दिला जात आहे. या मधूनच गेल्या काही दिवसांपासून ड्रोन शेतीचा पर्याय समोर येत आहे. शिवाय यासाठी केंद्र सरकारही आग्रही आहे. अत्याधुनिक शेती पद्धतीने शेतकऱ्यांचे कष्ट कमी होऊन कमी कालावधीत अधिकचे उत्पन्न शक्य आहे. त्यामुळे कीटकनाशकांवर फवारणीसाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे.
राहुल चव्हाण, शास्त्रज्ञ, अभियांत्रिकी कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisin Making at Home: वेलीवरच सुकवून द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्याची सोपी पद्धत

Water Withdrawal Ban: चिकोत्रा नदीकाठावर उपसाबंदी

Farm Roads: पेगरगव्हाण शिवारातील ३० वर्षांपासून बंद शेतरस्ते झाले खुले

Irrigation Water Issue: गाळामुळे गडहिंग्लजला पाटबंधारे लघू प्रकल्पातील साठा अल्प

LPG Cylinder Booking: सिलिंडर संपण्याची भीती, बुकिंग ८८ लाखांवर, गॅस टंचाईवर केंद्रानं काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT