Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : आंबेगावच्या पूर्वभागात गारपिटीने नुकसानीचे पंचनामे करा

रविवारी सकाळी तहसीलदार रमा जोशी यांनी या सर्व गावांना भेट देऊन थेट नुकसान झालेल्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली

Team Agrowon

Unseasonal Rain News पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात काल शनिवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीने (Hailstorm) नुकसान झालेल्या शेतातील पिकांचे तातडीने पंचनामे (Crop Damage Survey) करा, अशी माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.

तालुक्याच्या पूर्वभागातील धामणी, लाखणगाव, खडकवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, वाळुंजनगर, रोडेवाडीफाटा, बढेकरमळा ज्ञानेश्वरवस्ती द्रोणागिरीमळा या परिसराला काल शनिवारी सायंकाळी गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसला असून रस्ते शेतात, गोठ्यात, घराच्या अंगणात गारांचा अक्षरशः खच पडला आहे

गारांच्या माऱ्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाली आहे. रविवारी सकाळी तहसीलदार रमा जोशी यांनी या सर्व गावांना भेट देऊन थेट नुकसान झालेल्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधला

त्यांच्या समवेत नायब तहसीलदार दामूराजे असवले, पारगाव तर्फे अवसरी बुद्रूक विभागाचे मंडल अधिकारी विश्वास शिंदे, तलाठी विशाल मुंगळे, कृषी सहाय्यक प्रवीण मिर्के , कृषी सहाय्यक निशा शेळके, कोतवाल विकास दाभाडे, कोतवाल सुभाष पंडित हे होते.

यावेळी बोलताना तहसीलदार रमा जोशी म्हणाल्या, की नुकसान झालेल्या शेतातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरु असतानाही आज रविवार सुट्टीचा वार असूनही महसूल तसेच कृषी विभागाचे कर्मचारी हे या पाहणी दौऱ्याच्या वेळी हजर होते तसेच सर्व कर्मचाऱ्यांना गारपीटीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कामावर रुजू होण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी धामणी येथे सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रतीक जाधव, अक्षय विधाटे, श्याम बढेकर, संजय बढेकर, सुरेश विधाटे, सुरेश बढेकर, गोरक्ष विधाटे, पोलिस पाटील कल्पिता बोऱ्हाडे, शिरीष रोडे पाटील, उपसरपंच महेंद्र पोखरकर, अमोल वाळुंज, संदीप पोखरकर, जयसिंग पोंदे, सुशांत रोडे या शेतकऱ्यांनी गारपिटीने झालेल्या नुकसानीची माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT