Sugarcane Crushing Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane crushing : ‘गडहिंग्लजचा ऊस वेळेत गाळप करा’

गडहिंग्लज विभागातील कारखान्यांनी गतवर्षी कर्नाटकातील बारा हजार हेक्टरवरील ऊस आणला होता. तरीसुद्धा कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचेही त्यांनी गाळप केले आहे.

टीम ॲग्रोवन

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गडहिंग्लज विभागातील कारखान्यांनी गतवर्षी कर्नाटकातील बारा हजार हेक्टरवरील ऊस (Sugarcane) आणला होता. तरीसुद्धा कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचेही त्यांनी गाळप (Sugarcane Crushing) केले आहे. यामुळे कर्नाटकातील उसामुळे स्थानिक ऊस शिल्लक राहिल्याचे चित्र नाही. यंदा मात्र संबंधित कारखान्यांनी कर्नाटकातून ऊस आणताना त्याच्यासोबत स्थानिक ऊस गाळपाचा रेशो ठरविण्याची सूचना प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. अशोक गाडे यांनी केली.

गडहिंग्लजमधील उसाचे गाळप प्राधान्याने करण्याच्या नियोजनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार आज पालिकेच्या शाहू सभागृहात ही बैठक झाली. आजरा, संताजी घोरपडे, हेमरस, हमीदवाडा, इको-केन, अथर्व दौलत कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर म्हणाले, ‘गोडसाखर कारखाना बंदमुळे गडहिंग्लजच्या उत्पादकांवर अन्याय होत आहे. वेळेत उसाची उचल होत नाही. उशिरा ऊस जाण्याने वजन घटत आहे. यामुळे शेतकऱ्‍यांचे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी गडहिंग्लजचा ऊस प्राधान्याने गाळावा. अल्पभूधारक उत्पादकांची संख्या अधिक असून त्यांच्या ऊस तोडीला दहा हजारांवर खर्च येत आहे. एफआरपीत अपेक्षित वाढ नाही. उत्पादन खर्च वाढला आहे.’

गोडसाखरचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सर्व कारखान्यांनी कर्नाटकातील ऊस आणण्यावर नियंत्रण ठेवल्यास गडहिंग्लजच्या उत्पादकांचा ऊस वेळेत जाण्यास मदत होईल, असे सांगितले. राकेश पाटील यांनी कारखान्यांनी बसपाळीचा कालावधी कमी करण्याची सूचना मांडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT