Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : सोलापूर जिल्ह्यात जुन्याच निकषानुसार पंचनामे सुरु

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः जिल्ह्यात अतिवृष्टी (Heavy Rain) आणि सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Kharif Crop Damage) झाले आहे. असे असतानाही उत्तर सोलापूर तालुक्यातील नुकसानीसाठी जुन्या निकषांनुसारच पंचनाम्याचे (Crop Damage Survey) आदेश देण्यात आले आहेत. साहजिकच, शेतकऱ्यांना मदतही जुन्या निकषांनुसारच मिळणार आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सात आणि आठ सप्टेंबरला जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात उत्तर सोलापुरातील मार्डी आणि वडाळा मंडलात प्रत्येकी दहा गावांत जिराईत, बागायत आणि फळबागांचे नुकसान झाल्याचे कळवले होते. पण आता प्रत्यक्षात नुकसानीचे पंचनामे करताना मात्र, प्रशासनाने १३ मे २०१५ च्या आदेशानुसार नुकसान क्षेत्र कळवावे, असे आदेशात म्हटले आहे.

तसेच दोन दिवसात पंचनामे पूर्ण करा, असेही त्यात म्हटले आहे. पण जुन्याच निकषानुसार पंचनामे केल्यानंतर त्यासाठी मदतही जुन्याच पद्धतीने जिरायतीला हेक्टरी सहा हजार ८०० रुपये, बागायतीला १३ हजार ५०० रुपये आणि फळबागांसाठी १८ हजार रुपयांनुसार मदत मिळणार आहे. या आदेशावर तालुकास्तर अधिकारी बोलायला तयार नाहीत. तसेच एवढ्या कमी वेळात पंचनामे पूर्ण होतील का, या बाबतही साशंकता आहे.

तहसीलस्तरावरुन हा निर्णय होतो, पण नव्या निकषांनुसार आदेशाची दुरुस्ती होणार आहे. तसे बोलणे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, योग्य पद्धतीने पंचनामे होतील आणि मदतही मिळेल.
बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT