Department Of Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Department of Agriculture : आत्मा’च्या कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार

जिल्ह्यात कृषी विभागात ‘आत्मा’अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यास जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी नकार दिल्याने पेच तयार झाला आहे.

Team Agrowon

अकोला ः जिल्ह्यात कृषी विभागात (Department of Agriculture) ‘आत्मा’अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यास जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी नकार दिल्याने पेच तयार झाला आहे. यामुळे आठ ते दहा कर्मचाऱ्यांची नोकरी अधांतरी लटकली आहे. दोन महिन्यांपूर्वीच या कर्मचाऱ्यांचा वार्षिक करार संपुष्टात आलेला असून नव्याने नियुक्तीसाठी सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला जात आहे.

कृषी विभागाच्या विविध योजनांच्या विस्ताराचे प्रमुख काम गेल्या दहा-बारा वर्षांत आत्मा विभाग सांभाळत आहे. जिल्‍ह्यात गेल्या काळात विविध प्रकारचे चांगले कामसुद्धा झाले. जिल्ह्याचा राज्य पातळीवर गौरव झाला. शेतीशाळांची अंमलबजावणी, शासनाच्या योजना शेतकऱ्यांमध्ये जाऊन जनजागृती, योजनांचा प्रचार-प्रसार, कृषी मेळावे अशी विविध पातळीवरील कामे आत्माच्या माध्यमातून केली जात आहेत. जिल्ह्यातील सात तालुक्यांत आत्मामध्ये तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन, सहायक तंत्रज्ञान व्यवस्‍थापक अशी काही पदे, तर जिल्ह्याला कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली राहते.

आत्मा विभागाला मागील काही वर्षात पूर्णवेळ प्रकल्प संचालक, उपसंचालक नसल्याने हा डोलारा तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांनीच अधिक प्रमाणात ओढला. मात्र, त्यातही प्रामुख्याने जिल्हास्तरीय आत्मा कार्यालयातील ‘प्रताप’ थेट राज्य शासनापर्यंत पोचले. जिल्हाधिकारी निमा अरोरा यासुद्धा आत्माच्या कामकाजावर नाराज होत्या. आता त्यांच्याकडे पुनर्नियुक्तीसाठी फाइल देण्यात आलेली आहे. मात्र, त्यांनी अशा प्रकारची नियुक्ती सर्वांना देण्यास नकार दिला.

त्यांच्या या भूमिकेमुळे संबंधितांमध्ये धास्ती तयार झाली आहे. सोमवारी (ता.सात) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पुनर्नियुक्तीचा मुद्दा निघाला होता. त्याहीवेळी त्यांनी नकार दर्शविल्याचे समजते. यामुळे आता संबंधित न्याय कसा मिळेल या विवंचनेत सापडले आहेत. यातून मार्ग निघण्यासाठी हे कर्मचारी विविध स्तरावरून पाठपुरावा करू लागले आहेत. बुधवारी (ता. नऊ) हे कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांची पुन्हा भेट घेऊन विनंती करणार आहेत.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न

आत्मामध्ये दहा ते बारा वर्षे नोकरी केल्याने यावरच काही कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बनलेला आहे. आता जर पुनर्नियुक्ती मिळाली नाही तर पुढे काय करावे, असा प्रश्‍न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Rate: केळी दर निश्‍चिती बाबतप्रशासनाची चालढकल

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा ‘जीआर’ मागे घेणार नाही : विखे पाटील

Gokul Dairy Products: ‘गोकुळ’ आइस्क्रीम, बटर बाजारात आणणार

Government Decision: कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉपच देणार

Agricultural Damage: पंजाबमध्ये १.८४ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT