Disaster Management Training
Disaster Management Training Agrowon
ताज्या बातम्या

Disaster Management : बारामती येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Team Agrowon

बारामती : ‘‘आपत्तीच्या काळात (Disaster) प्रशिक्षित युवकांची आवश्यकता असते. त्यामुळे युवकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे (Disaster Management) प्रशिक्षण घेऊन या काळात मोलाचे योगदान द्यावे,’’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी केले.

मुंबई येथील मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथील क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या ‘आपदा मित्र’ प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकतीच भेट दिली.

त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, तहसीलदार विजय पाटील, परीविक्षाधीन तहसीलदार नेहा शिंदे आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘बारामती आणि इंदापूर तालुक्यातील युवक या प्रशिक्षणात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याने समाधान वाटत आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन परिस्थिती गंभीर होते.

अशा वेळी मदत कार्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते. या प्रशिक्षणामुळे आपत्तीच्या प्रसंगी आपतग्रस्तांना तातडीने मदत देणे, विविध आपत्ती संदर्भात प्रतिबंध, निवारण, पूर्वतयारी, प्रतिसाद, मदत व पुनर्वसन इत्यादी बाबी सुव्यवस्थितपणे हाताळण्यासाठी युवक-युवती तयार होतील,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रशिक्षणामध्ये बारामती आणि इंदापूर तालुक्यातील युवकांसह आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, कोतवाल व स्वयंसेवक यांचा समावेश आहे. येत्या १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Lok Sabha : बीडमध्ये ५५ वैध उमेदवार; छाननीअंती १९ उमेदवार बाद

Water Storage : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Green Hydrogen Project : हिमाचल प्रदेशच्या झाकरीत देशातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प

Sustainable food : कार्बन फूटप्रिंट की शाश्‍वत अन्न?

Mumbai APMC Scam : संजय पानसरे यांना न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT