VAnashree Award
VAnashree Award Agrowon
ताज्या बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj Vanashree Award : छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराचे रविवारी वितरण

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राज्यातील वन क्षेत्रातील (forest area) वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना देण्यात येणाऱ्या  २०१८ व २०१९ यावर्षीच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ (Chhatrapati Shivaji Maharaj Vanashree Award) वितरण सोहळा रविवारी (ता.२६) दुपारी १ वाजता यशदा येथे होणार आहे.

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार आहेत.

यासोबतच वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक वाय. एल. पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण डॉ. सुनीता सिंग आदी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था व ग्राम, विभाग, जिल्हा या पाच संवर्गामध्ये राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आणि महसूल विभाग (वृत्तस्तर) स्तरीय प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात येते.

राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाकरिता १ लाख रुपये, द्वितीय क्रमांक ७५ हजार रुपये, तृतीय क्रमांक ५० हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र तसेच विभाग स्तरीय प्रथम क्रमांकाकरिता ५० हजार रुपये आणि द्वितीय क्रमांकाकरिता ३० हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

२०१७ पर्यंत ५२३ व्यक्ती, संस्थांना ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले आहे.

२०१८ व २०१९ मध्ये प्रत्येकी १४ याप्रमाणे एकूण २८ व्यक्ती, संस्था यांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभाग पुणे विभागीय वनअधिकारी ए. पी. थोरात यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT