Shinde Group Agrowon
ताज्या बातम्या

Disqualification of 16 MLAs : मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस जारी

Suspension of 16 MLAs : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर आज विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांविरुद्धच्या अपात्रतेबाबत नोटीस पाठविली आहे.

Team Agrowon

Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडी सरकारच्या विरुद्ध एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ समर्थक आमदार आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यावर आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवले आहेत. त्यामुळे अध्यक्ष लवकरच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट झाले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने निकाल देत असताना तत्कालीन राज्यपाल आणि शिवसेनेच्या आमदारांच्या कृतीवर ताशेरे ओढले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्रतेबाबत विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला ३ महिन्यांचा काळ लोटत असताना राष्ट्रवादीचे काॅग्रेसमध्ये बंड झाले. अजित पवार यांच्यासह बहुसंख्य आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. या सत्तासंघर्षानंतर आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंसह इतर १६ आमदारांना नोटीस देऊन या कार्यवाहीची सुरुवात केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 90 दिवसांच्या विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजीच्या निकालात विधानसभा अध्यक्षांना याचिकांवर मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले असतानाही राहुल नार्वेकर हे जाणूनबुजून सुनावणीला उशीर करत असल्याचा दावा ठाकरे गटाच्या आमदारानी केला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT