Well Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Well Acquisition : विहीर अधिग्रहणाचा मोबदला रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

शिंदखेडा तालुक्यात नेहमी दुष्काळाचे सावट असते. तालुक्यात बागायत क्षेत्र कमीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही.

Team Agrowon

Water Shortage News निमगूळ, जि.जळगाव ः शिंदखेडा तालुक्यातील २३ गावांना विहीर अधिग्रहणाचा (Well Acquisition) मोबदला (Compensation) न मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. मोबदला त्वरित मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शिंदखेडा तालुक्यात नेहमी दुष्काळाचे सावट असते. तालुक्यात बागायत क्षेत्र कमीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीतच दर वर्षी मार्च महिन्यापासून ते ऑगस्टमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर समस्या वर्षानुवर्षे भेडसावत आहे.

गावातील लोकप्रतिनिधी व शासन नियमाप्रमाणे ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई असते त्या गावांना गावातील लोकप्रतिनिधींची मदत घेत गावानजीक तसेच सोयीस्कर ठिकाणी विहिरीचे अधिग्रहण शासनाच्या देयकानुसार केले जाते.

शेतीचे उत्पन्न बाजूला सारत शेतकरी गावाची समस्या असल्याने स्वतःचा रब्बी हंगाम सोडून स्वतःचे नुकसान सहन करतो.

शासनाच्या देयकावर विश्वास ठेवून त्याला दोन वर्षांपर्यंत विहीर अधिग्रहणाचा मोबदला अनुदान मिळत नाही. मोबदला न मिळाल्याने व रब्बी हंगामाचे नुकसान होते आहे, म्हणून संबंधित विभागाने लवकरात लवकर अनुदान उपलब्ध करून पाणीटंचाईची समस्या सोडवावी, अशी मागणी सरपंच महा सेवासंघ जिल्हाध्यक्ष तथा सोनशेलू सरपंच प्रियांका बडगुजर यांनी केले आहे.

मोबदला न मिळालेली गावे

मागील २०२१-२२ वर्षीचे शिंदखेडा तालुक्यात सोनशेलू, विखरण, सवाईमुकटी, चुडाणे, सुराये, रुदाने, कर्ले, जोगशेलू, मांडळ, अंजनविहिरे, चौगाव खुर्द, खलाणे, चौगाव बुद्रूक, दरखेडा, खर्दे बुद्रूक, जातोडा, मेथी, वाडी, वरझडी, देवी, सुलवाडे अशा २३ गावांतील पाणीटंचाईचा मोबदला अद्यापही शेतकऱ्यांना मागील वर्षापासून मिळालेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान धन धान्य योजनेला मान्यता; २४ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार

Crop Insurance Delay: विमा कंपनीकडे थकला १०० कोटींचा परतावा

Lumpy Skin Disease: ‘लम्पी’ची लक्षणे आढळलेल्या १०० जनावरांवर उपचार सुरू

Harnbari Dam: द्वारकाधीश कारखान्याकडून हरणबारी धरणाचे जलपूजन

Landslide Risk: दोन गावांतील ८०० जीव दरडीच्या छायेत

SCROLL FOR NEXT