Cotton Weed Control Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Crop : कापसावरील रोगामुळे फवारणीचा खर्च वाढला

Spraying on Cotton Crop : मागील महिन्यातच पिकात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली.

Team Agrowon

Cotton News : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती बरी आहे. पण त्यात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाला आहे. या समस्येला रोखण्यासाठी शेतकरी अळी, अंडीनाशकांची फवारणी घेत आहेत.

पूर्वहंगामी कापूस पिकाची लागवड मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात झाली होती. पिकांची वाढ बऱ्यापैकी आहे. त्यात पाते, फुले लगण्यासह कैऱ्या पक्व होण्याची गती सुरू आहे. परंतु मागील महिन्यातच पिकात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली.

अशात खासगी तज्ज्ञ, कृषी केंद्रचालक आदींच्या सल्ल्यानुसार शेतकरी या अळीला रोखण्यासाठी अळीनाशके सोबत कीडनाशके, संप्रेरके आदींचा उपयोग करीत आहेत. यासाठी एकरी एक हजार रुपये किमान खर्च येत आहे.

प्रशासन मात्र थेट गावांत जाऊन किंवा शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासंबंधी कार्यवाही करीत नसल्याचे दिसत आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाने ममुराबाद (ता.जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने दृकश्राव्य माध्यमातून चित्रफीत प्रसारित केली. पण अल्प शेतकरीच समाज माध्यमे (सोशल मिडिया) व इतर बाबींवर सक्रिय आहेत. कमाल कापूस उत्पादकांपर्यंत ही माहिती किंवा जनजागृतीचे मुद्दे पोचलेले नाहीत.

शेतकऱ्यांना अळीला रोखण्यासाठी नेमके कोणते कीडनाशक, अळीनाशक उपयोगात आणले पाहिजे, त्यात काय घटक असावेत, अनावश्यक फवारणी कशी टाळता येईल, याबाबत नेमकी माहिती कुठेही देण्यात आलेली नाही. कृषी सहायक, पर्यवेक्षक यांनी आपापल्या भागात सर्वेक्षण केले, पण अद्याप पूर्वहंगामी कापसात ही अळी आलेली नाही, असा अहवाल वरिष्ठांना देवून अंग काढून घेतले आहे. परिणामी यासंबंधीचा प्रकोप वाढत असून, शेतकरीदेखील संभ्रमावस्थेत आहेत.

कोरडवाहू कापूस पिकात हवा तसा पाऊस नसल्याने जोमदार वाढ दिसत नाही. काळ्या कसदार जमिनीत कापूस पीक बऱ्या स्थितीत आहे. परंतु हलक्या, मुरमाड क्षेत्रात पिकाची स्थिती खराब होत आहे. शेतकरी संप्रेरके व वाढीला पूरक बाबींची फवारणी करून पिकाला वाचविण्याचा, वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

लागवड स्थिती अशी...

खानदेशात सुमारे सव्वालाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक आहे. एकूण लागवड साडेआठ लाख हेक्टरवर झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील कापसाखालील लागवड पाच लाख ५१ हजार हेक्टर एवढी आहे. लागवड जळगावात काहीशी कमी झाली आहे. धुळ्यात दोन लाख आणि नंदुरबारात ९८ हजार हेक्टरवर कापूस पीक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: टोमॅटो दरात सुधारणा; सिताफळाला चांगला भाव, गवार तेजीत तर हळद-केळी दर स्थिर

Monsoon Rain: राज्यात पाऊस कमी होणार; मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार

Solar Project Nashik : दिवसा वीज देण्यासाठी सौरप्रकल्प पूर्ण करा

Livestock Market : बुलडाणा जिल्ह्यात जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार

Day-Time Electricity : अकोलेकाटी परिसरात दिवसा वीजपुरवठा

SCROLL FOR NEXT