Jaykwadi Dam
Jaykwadi Dam Agrowon
ताज्या बातम्या

‘जायकवाडी’च्या १८ दरवाजांतून २०४५३ क्युसेकने विसर्ग

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून (Water Discharge From Jaykwadi Dam) महिन्याभरात पुन्हा दुसऱ्यांदा ८ दरवाजे सोमवारी (ता. ८) अर्ध्या फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात (Godavari River Bed) विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी (ता. ९) दरवाजांची संख्या १० ने वाढवून त्यांची उंची एक फुटापर्यंत वाढवून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी ५ हजार २४० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात सांडव्याद्वारे ५ हजार २४० व जलविद्युत निर्मिती केंद्रामधून १५८९ असा एकूण ६ हजार ८२९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. सोमवारी प्रकल्पात ९३.३८ टक्के पाणीसाठा होता. तर पाण्याची आवक ६ हजार ८२९ क्यूसेकने सुरू होती. तितकेच पाणी सोडण्यात येत होते. दुसरीकडे माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्याव्दारे ६०० क्युसेक विसर्ग गेल्या १९ दिवसांपासून सुरू आहे.

दरम्यान, मंगळवारी (ता.९) सकाळी १० ते १०.३० वाजेदरम्यान १८ दरवाजांतून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे ९४३२ व ९४३२ क्युसेक मिळून १८८६४ क्युसेक, जलविद्युत केंद्रातून १५८९ क्युसेक असा एकूण २०४५३ क्युसेक विसर्ग सुरू होता. प्रकल्पाची निर्धारित पाणी पातळी कायम ठेवून विसर्गामध्ये वाढ किंवा घट होऊ शकते, असे प्रकल्प प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पाटबंधारे विभागाच्या वतीने कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण, धरण अभियंता विजय काकडे, गणेश खराडकर यांनी दिला. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT