Nagar News : नगर जिल्हा बँकेने २९६ कोटी रुपयांचे पशुपालन कर्ज वितरित केले आहे. सवलतीच्या दरातील कर्जवितरण, पंतप्रधान पीकविमा योजना, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना व एकरकमी कर्ज परतफेड अशा अनेक योजनांचा त्यात समावेश आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी सांगितले.
वर्पे म्हणाले, ‘पीककर्जाच्या बाबतीत बँकेचे एकरी कर्जदार हे राज्यातील इतर बँकांच्या तुलनेत सर्वांत जास्त आहेत. त्याचा फायदा विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदांना झाला. २१ जुलै २०२३ अखेर जिल्हा बँकेमार्फत २ लाख ९९ हजार ८८१ शेतकऱ्यांना २ हजार ३३७ कोटींचे कर्ज वितरित केले. उद्दिष्टाच्या ८६ टक्के कर्ज वितरित केले. जिल्ह्यातील एकूण कर्जवाटपात जिल्हा बॅंकेचा ७५ टक्के वाटा आहे.
सभासदांचा १ रुपया भरन बॅंकेने विमा उतरवला व स्वनिधीतून हप्ता भरला आहे. नाबार्डकडून २०२०-२१ ची ३ टक्के व्याज सवलत ३३.५६ कोटी २२ जुलै २०२२ रोजी बँकेस प्राप्त झालेली असून, ती रक्कम त्याच दिवशी तालुका शाखांमार्फत कर्जदार सभासदांच्या खाती वर्ग केली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (राज्य शासन) याबाबत नगर जिल्हा बँक दरवर्षी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या शेतकरी सभासदांना मोठ्या प्रमाणात अल्पमुदत पीककर्ज पुरवठा व पशुपालन खेळते भांडवल कर्जपुरवठा करत आहे.
यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. सवलत योजनेअंतर्गत ३ टक्के या प्रमाणे ६ टक्के व्याज सवलत मिळत आहे. शेतकऱ्यांची व्याजाची रक्कम पूर्णपणे त्याचे बॅंक खात्यात जमा होऊन त्याला शून्य टक्के व्याजदर पडत आहे.
एककरमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत जिल्ह्यातील थकित शेतकरी सभासदांना शासनाचे विविध योजनेचा लाभ होण्यासाठी राज्यातील एकमेव नगर जिल्हा सहकारी बॅंकेने एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्याचा निर्णय बॅंकेचे चेअरमन व संचालकांनी घेतला आहे. २ नोव्हेंबर २०२२ रोजी २ लाख ७९ हजार १३० शेतकऱ्यांची ३२.८१ कोटींचा ‘नाबार्ड’कडे प्रस्ताव सादर केला असून, अद्याप रक्कम प्राप्त झालेली नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.