MLA Dhiraj Lingade Agrowon
ताज्या बातम्या

MLC Election : जुन्या पेन्शनच्या मुद्द्यामुळे लिंगाडेंना आमदारकीची लॉटरी

सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करणे शक्य नसल्याचे गेल्या काळात स्पष्ट केल्याचा बदला मतदारांनी घेतल्याच्या पोस्ट फिरत आहेत.

Team Agrowon

Amaravati MLC Election ः अमरावती पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे (Dhiraj Lingade) अखेर विजयी झाले. त्यांनी विद्यमान आमदार रणजित पाटील (Ranjit Patil) यांची हॅट्ट्रीक चुकवली.

लिंगाडे यांना जुन्या पेन्शनच्या (Old Pension Scheme) मुद्द्याने विजयापर्यंत पोहोचल्याचे आता स्पष्टपणे बोलले जात आहे. त्यांची उमेदवारी ऐनवेळी जाहीर झाली होती. त्यांना संपूर्ण मतदारांपर्यंत पोहोचताही आले नसताना झालेला विजय हा मोठा धक्का ठरला आहे.

विद्यमान आमदार डॉ. पाटील यांच्याविरुद्ध ठिकठिकाणी रोष दिसत होता. त्यातही सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करणे शक्य नसल्याचे गेल्या काळात स्पष्ट केल्याचा बदला मतदारांनी घेतल्याच्या पोस्ट फिरत आहेत.

मतदानापूर्वी शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत समाज माध्यमातून जोरदार शेअरिंग झाले. मतपेटीतून आपला रोष दाखवण्याची संधी चालून आली असल्याचे आवाहन केले जात होते.

त्याचाच फायदा लिंगाडे यांना मिळाला. त्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आवाज उठवण्याचे आश्‍वासन दिले होते. हे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरले.

विजयी झालेले लिंगाडे यांना ४६ हजारांवर मते मिळाली. तर, डॉ. पाटील यांनी ४२ हजारांवर मते घेतली. या दोन उमेदवारांनाच ८५ हजारांवर मते मिळाली. या मतदार संघात ५० टक्के पदवीधरांनी पाठ फिरवल्याने निकाल धक्कादायक लागू शकतो हे स्पष्ट दिसत होते.

वडिलानंतर आता मुलगाही आमदार

बुलडाण्यातील रामभाऊ लिंगाडे हे १९७८ ला अकोला-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाले होते. आता त्यांचा मुलगा धीरज २०२३ च्या निवडणुकीत आमदार बनले आहेत.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे बुलडाण्यात काम आहे. एक उच्चशिक्षित, सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख बनलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज 

Farm Loan Waiver: कर्जमाफीबाबतच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत, पण नियमित कर्जदारांनाही दिलासा मिळावा- अजित नवले

Power Theft Cases: तीन महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्या पकडल्या

Pending Works: प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : खासदार डॉ. कल्याण काळे

limate Change Hits Marine Fisheries : हवामान बदलामुळे मासेमारीचे दिवस घटले; सीएमएफआरआयच्या संचालकांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT