Medicinal Plant Garden | Rashtriya Ayush Abhiyan Agrowon
ताज्या बातम्या

Medicinal Plant : राजूरला साकारले धन्वंतरी औषधी वनस्पती उद्यान

जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत जुन्नरच्या आदिवासी भागातील राजूर-२ येथे धन्वंतरी औषधी वनस्पती उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.

टीम ॲग्रोवन

जुन्नर, जि. पुणे ः जिल्हा परिषदेच्या (Pune ZP) राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत (Rashtriya Ayush Abhiyan) जुन्नरच्या आदिवासी भागातील राजूर-२ येथे धन्वंतरी औषधी वनस्पती उद्यानाची (Medicinal Plant Garden) निर्मिती करण्यात आली आहे. आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र, राजूर या पथकाने उद्यानाची उभारणी केली आहे. सुमारे १५ गुंठे क्षेत्रात जून २० पासून दर वर्षी काही औषधी वनस्पती आणून त्यांची लागवड केली जात आहे.

उद्यानात विविध चाळीस प्रजातींच्या सुमारे ७० लहान-मोठ्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांना ग्रामपंचायतीद्वारे पाणी दिले जाते. आवश्यकतेनुसार शेणखताचा वापर केला जातो. झाडांची देखभाल, उद्यान साफसफाई, पाणी-खते देणे आदी कामे केंद्रातील कर्मचारी करतात तसेच स्थानिक ग्रामस्थदेखील श्रमदान करून सहकार्य करतात.

उद्यानात अडुळसा, तुळस, जास्वंद, चित्रक, दंती, बेल अर्जुन, जांभूळ, हिरडा, बेहडा, आवळा, फणस, पारिजातक, जयपाल, अग्निमंथ, पिंपळी, सफेद मुसळी, कोरपड, कुडा, भुई आवळा, सर्पगंधा, खदिर, पळस, बहवा, कटेसावर, रिठा, निलगिरी, अशोक, निरगुडी, बकुळ, रुद्राक्ष, शतावरी, शमी, गुळवेल, पानफुटी, अस्थीवेल, आघाडा, पिंपळ, उंबर अशा दुर्मिळ औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.

खोकला, दमा यांसारख्या श्वसन संस्थेच्या आजारांवर अडुळसा व तुळस उपयुक्त आहे. सर्व प्रकारचे सांधेदुखी, सांधे सुजणे यासाठी निर्गुडी, एरंड, पारिजातक उपयुक्त आहे. त्वचेवरील जखमा तसेच हृदय रोगावरील औषधांमध्ये अर्जुन वनस्पतींची साल वापरतात. केशवर्धन व केसांच्या समस्यांसाठी तेल तयार करताना जास्वंद वापरतात. आवळा, हिरडा, बेहडा या वनस्पतींच्या फळांचा वापर त्रिफळा चूर्ण, च्यवनप्राश, पोटाचे विकार तसेच प्रतिकार शक्तीवर्धक अनेक औषधनिर्माण मध्ये केला जातो.

औषधी वनस्पतीची माहिती व आरोग्यासाठी घरगुती उपयोग लोकांना माहीत व्हावेत. चांगल्या आरोग्यासाठी, प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी तसेच काही सामान्य आजारासाठी लोकांनी दैनंदिन जीवनात औषधी वनस्पतींचा वापर करावा या उद्देशाने हे उद्यान उभारण्यात आले आहे.

- डॉ. प्रदीप गोसावी, वैद्यकीय अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘ते’ पुन्हा आले!

Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT