Kharif Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing 2023 : माॅन्सूनची प्रतिक्षा तरीही खरीप पेरणीचा वाढला वेग

Monsoon Update : मे महिन्यात झालेल्या पावसामुळे देशभरात यंदाच्या खरीपच्या कामांना वेग आला आहे. मे अखेरपर्यंत ७१ लाख १९ हजार हेक्टरपर्यंत पेरण्या झाल्या आहेत. माॅन्सूनच्या पावसामुळे आणखी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Kharif Season News : यंदा माॅन्सूनचा पाऊस उशिरा दाखल होणार असल्याने खरीप हंगामातील भात, कडधान्ये आणि तेलबियांच्या पेरण्या रखडल्या आहेत. मात्र, मे महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे देशभरात ऊस, कापूस आणि भरडधान्याचा पेरा वाढण्यास मदत झाली आहे. गत वर्षीपेक्षा १ लाख ५३ हजार क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मे अखेरपर्यंत ७१ लाख १९ हजार हेक्टरपर्यंत पेरण्या झाल्याची माहिती कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार १९७१-२०२३ या कालावधीमध्ये यंदा सरासरीपेक्षा १० टक्के पाऊस जास्त झाला. मे महिन्यात ६७.३ मिलीमीटर पाऊस पडला. तो सन १९०१ पासून मे महिन्यात पडलेला सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचा पाऊस होता. त्यापूर्वी सन १९८७ मध्ये ९५ मिमी आणि सन २०२१ मध्ये ६८.२ मिमी पाऊस झाला होता.

हवामान खात्यानुसार, उत्तर-पश्चिम भारतात मे महिन्यात ९४ टक्के जास्त पाऊस पडला, तर मध्य भारतात ६४ टक्के जास्त पाऊस झाला. मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेले पंजाब, हरियाणा, तेलंगणा आणि इतर महत्त्वाच्या राज्यांमध्ये पेरणीची कामे सुरू व्हायची आहेत. पण तत्पूर्वी देशात २.१७ लाख हेक्टरवर भात लागण झाली आहे. मागील हंगामात २.९६ लाख हेक्टरवर लागण झाली होती. आतापर्यंत, नागालँडमध्ये सर्वाधिक क्षेत्रावर लागण झाली. त्यानंतर आसाम आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो.

कडधान्याचे क्षेत्र मागील वर्षी ०.९१ हजार हेक्टर होते. ते यंदा ०.८७ हजार हेक्टरपर्यंत कमी झाले आहेत. यामध्ये कर्नाटकमध्ये ०.६३ हजार हेक्टर आणि उत्तर प्रदेशमध्ये ०.१४ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यंदा तूर आणि उडीदला चांगला दर मिळल्याने या दोन्ही पिकांचे क्षेत्र वाढल्याचे दिसते, तर मूग आणि इतर कडधान्याखालील लागवडीचे क्षेत्र घटले आहे.

तेलबियांचे एकरी क्षेत्र गतवर्षी ०.५६ हजार हेक्टर होते. यंदा ०.५३ हजार हेक्टरवर आहे. यामध्ये तीळचे क्षेत्र ०.०८ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहे. सोयाबीन आणि भुईमुगाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे, तर सूर्यफुलाचेही क्षेत्र घटले आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान यांसारख्या प्रमुख उत्पादक राज्यांमधील शेतकरीही माॅन्सूननंतर पेरणी करील.

खरीप भरडधान्यांमध्ये मका आणि बाजरीची १.५ लाख हेक्टर पेरणी झाली. मागील वर्षीच्या १.३ लाख हेक्टरच्या तुलनेत जास्त आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर या तीन राज्यांमध्ये सर्वाधिका पेरणी झाली आहे.

यावर्षी अपेक्षेप्रमाणे ऊस आणि कापूस पिकाचे क्षेत्र वाढले आहे. साखर कारखान्यांकडून वेळेवर एफआरपी दिल्याने शेतकऱ्यांना अधिक ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन मिळते. गेल्या वर्षीच्या ४६.६७ लाख हेक्‍टरच्या तुलनेत आतापर्यंत ४६.९८ लाख हेक्‍टरवर उसाची लागवड झाली आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हे राज्य आघाडीवर आहेत.

गेल्या दोन हंगामात हमीभावापेक्षा जास्त असलेल्या किमतींमुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी १०.७८ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा ते १३.४३ लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र वाढले आहे. यामध्ये हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमध्ये लागवड १२.५ लाख हेक्टरपर्यंत झाले आहे. माॅन्सूनच्या आगमनानंतर महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातमधील लागवड क्षेत्र आणखी वाढणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT