Onion Market rate
Onion Market rate Agrowon
ताज्या बातम्या

Onion Rate Crisis : हतबल शेतकऱ्याकडून चार एकर कांदा मोफत

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Onion Rate Crisis नगर ः ‘‘आधी डाळिंब होते, त्याचे ‘तेल्या’मुळे नुकसान (Onion Crop Damage) झाल्याने ते काढले. त्यानंतर चार एकरांवर कांदा (Onion Cultivation) लावला.

काढणीला (Onion Harvesting) येईपर्यंत सव्वादोन ते अडीच लाख रुपये खर्च केला. त्यातील दहा गुंठ्यांवरील कांद्याची काढणी केली. विक्रीतून येणाऱ्या रकमेचा हिशेब केला. त्यातून खर्च आणि कष्ट सोडा, सध्या काढणीला (Onion Rate) लागणरा खर्चही निघणार नसल्याचे दिसू लागले.

त्यामुळे वैतागून चार एकरांवरील कांदा काढणी न करता तसाच लोकांसाठी मोफत खुला केला. दोन दिवसांत लोकांनीही चार एकर कांदा हातोहात नेला,’’ अशी दाहक वास्तवता संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील शेतकऱ्याने डोळ्यांत पाणी आणून सांगितली.

वसंतराव थोरात असे या शेतकऱ्याचे नाव. नुकसान करून घेण्यापेक्षा चार एकर क्षेत्रावरील कांदापात शेळ्या-मेंढ्यांना दिली. पाहिजे त्याने मोफत कांदा काढून घेऊन जावा, असे आवाहन केले. सर्व कांदा लोकांना मोफत देत आपला संताप थोरात यांनी व्यक्त केला.

नगर जिल्ह्यासह राज्यात अलीकडच्या काही वर्षांपासून कांदा लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. मात्र कांदा उत्पादकांची अवस्था गंभीर होत आहे. कांदा लागवडीचे क्षेत्र वाढत असताना सध्या किलोला अवघा पाच ते सहा रुपये भाव मिळत आहे.

सध्याचा दर पाहता मजुरी, गाडीभाडे, हमाली, तोलाई व अडतीवर होणारा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर पैसे खिशातून देण्याची नामुष्की ओढविली आहे.

दोन दिवसांत शेत मोकळे

काढणीला आलेला कांदा काढणे आवश्यक होते. मात्र केवळ काढणीवर होणारा खर्च मिळणाऱ्या दरापेक्षा अधिक होता. त्यामुळे लोकांना शेतातून कांदा काढून नेण्याचे आवाहन केले अन् पिंपरणे गावासह परिसरातील जोर्वे, कनोली येथील ग्रामस्थांची कांदा काढून नेण्यासाठी झुंबड उडाली. दोन दिवसांत चार एकर रान मोकळे झाले.

भाव कोसळल्याने फसगत झाली. वर्षभरातील आर्थिक नियोजन फसले. मजूर आणि कृषी केंद्रातून विकल्या जाणाऱ्या निविष्ठा शेतकऱ्याला जगू देऊ शकत नाही. शेतकरी लुटीचा केंद्रबिंदू झाला आहे. शेतकऱ्यांना कोणी वाली नाही.

वसंतराव थोरात, शेतकरी, पिंपरणे, ता. संगमनेर, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT