Cow Research Center Agrowon
ताज्या बातम्या

Cow Research Center : देशी गाय संशोधन केंद्र अत्याधुनिक करणार

कृषिमंत्री अब्दूल सत्तार ः देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची पाहणी

टीम ॲग्रोवन

पुणे ः ‘‘देशातील आणि महाराष्ट्रातील विविध दुर्मीळ देशी गोवंशच्या संवर्धनाचे (Cow Preservation) काम महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे (Pune Agricultural College)सुरू आहे. या कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला अत्याधुनिक करण्याबरोरच देशातील सेंटर फॉर एक्सलन्स करण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या ८९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात केली जाईल,’’ अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.

मंत्री सत्तार यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला मंगळवारी (ता.१) भेट दिली. या वेळी त्यांनी केंद्रातील सर्व विभागांना भेटी देऊन पाहणी केली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळ, देशी गाय संशोधन केंद्राचे प्रमुख सोमनाथ माने या वेळी उपस्थित होते.

मंत्री सत्तार म्हणाले, ‘‘ब्राझीलसारख्या देशाने आपल्याच देशीवंशाच्या गायीवर संशोधन करून, सर्वाधिक दूध देणारी गाय विकसित केली आहे. आता ब्राझिल देशाचे अर्थकारण केवळ दुधावर चालते. मात्र आपले देशी गोवंशाकडे दुर्लक्ष झाले आहे. आता देशी गाय संशोधन केंद्राद्वारे देशातील विविध देशी गोवंशावर संशोधन आणि प्रजनन केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून दर्जेदार गायी निर्माण होऊन,

त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. या केंद्राच्या अत्याधुनीकरणाबरोबरच हे केंद्र देशातील सेंटर फॉर एक्सलन्स करण्यासाठीच्या ८९ कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल.’’

‘देशी गोवंश दुधाची विक्री केंद्र काढणार’

‘‘कृषी विद्यापाठे आणि शासकीय कृषी महाविद्यालयांच्या परिसरात देशी गोवंशांची दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ‘फुले अमृत’ नावाचा ब्रॅण्डदेखील विकसित करण्यात आला असून या ब्रॅण्डअंतर्गत दुग्धजन्य पदार्थ विक्रीची ५०० चौरस फुटांची विक्री केंद्र सुरू केली जाणार आहेत,’’ असेही मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT