Crop Damage Compensation Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : अतिवृष्टीने नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत जाहीर केली; मात्र ती अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

Team Agrowon

Crop Damage Compensation News परतूर, जि. जालना : पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत (Compensation) जाहीर केली; मात्र ती अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

सदर मदत तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या परतूर शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत संघटनेने नुकतेच परतूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शासनाने अतिवृष्टी झाल्यानंतर तातडीने मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याची घोषणा केली होती.

शासनाच्या घोषणेला सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

दसरा, दिवाळी हे मोठे सण शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीला तोंड देत साजरे करावे लागले. मदत जमा करण्यास शासन जाणीपूर्वक चालढकल करत असल्याचा आरोप करत आठ दिवसांत मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही तर, १३ फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला.

निवेदनावर तालुकाध्यक्ष गणेश राजबिंडे, शिवाजी महाराज भोसले, रमेश गायकवाड, तात्याराव मोरे, वामन सोळंके, वैजनाथ दराडे आदींच्या सह्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT