Ashadhi Wari 2023 Agrowon
ताज्या बातम्या

Ashadhi Wari 2023 : निवृत्तिनाथांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Pandharpur Wari 2023 : सालाबादप्रमाणे आषाढीवारीसाठी निवृत्तिनाथांची पालखी ज्येष्ठ पौर्णिमेऐवजी एक दिवस आधीच निघाली. तरीही भाविकांची प्रचंड गर्दी झाली.

Team Agrowon

Nashik News : सालाबादप्रमाणे आषाढीवारीसाठी निवृत्तिनाथांची पालखी ज्येष्ठ पौर्णिमेऐवजी एक दिवस आधीच निघाली. तरीही भाविकांची प्रचंड गर्दी झाली. शुक्रवार (ता.२) पासूनच या वारीसाठी भाविक व काही दिंड्या त्रंबकेश्वरनगरीत येऊन विसाव्यास होत्या. कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी व त्र्यंबकेश्वर व निवृत्तिनाथांच्या समाधीच्या दर्शन घेत वारकरी, भाविक हरिनामाच्या जयघोषात भक्तीत न्हाऊन निघाले.

शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे निवृत्तिनाथांची समाधीचे पूजन झाल्यावर दुपारी दोन वाजता प्रस्तावाचे अभंग व भजन ह.भ.प.जयंत महाराज गोसावी, मानकरी व फडकरी यांनी केल्यावर सजविलेल्या पालखीत नाथांची चांदीची प्रतिमा व पादुका ठेवण्यात आल्या. त्यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी हरिनामाचा जयघोष केला.

पालखी कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी आणण्यात आली. त्यासमवेत मानाच्या दिंड्या व दिंडी प्रमुख उपस्थित होते. मोहन महाराज बेलापूरकर, भागवत महाराज लोणारे, बाळकृष्ण महाराज डावरे, एकनाथ महाराज गोळेसर यांच्यासह निफाड, लासलगाव, सिन्नर, संगमनेर तालुक्यांतील दिंड्या व त्यांचे फडकरी यात सहभागी झाले.

कुशावर्त तीर्थावर पालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचक्के यांच्या हस्ते नाथांच्या प्रतिमेची पूजा व अभिषेक करण्यात आला. त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ उत्तर महाद्वारासमोर त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त भूषण अडसरे व संतोष कदम यांनी पालखीचे स्वागत केले. शहरभर पालखी स्वागतासाठी मोठ्या रांगोळ्या रेखाटण्यात आल्या. पालखीच्या पुढे नृत्य करणारे बारा अश्व सहभागी झाले.

कोरोना काळात दोन वर्षे खंड पडल्याने तो भरून काढण्यासाठी ऐन उन्हात आबालवृद्ध पालखीसमवेत निघाले आहेत. प्रस्थानप्रसंगी मराठवाड्यातील भाविकांची अल्प उपस्थिती होती. परंतु नाशिक जिल्ह्यातील व लगतच्या जिल्ह्यांतील भाविक मोठ्या संख्येने आहेत.

निर्मलवारीसाठी प्रयत्नशील

वारी पायी पंढरपूरकडे दरमजल करीत जाते. भाविकांसाठी समवेत प्रसाधनगृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, प्रथमोपचार व्यवस्थेसह सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

यासाठी शासन व अधिकारी व ग्रामस्थांचा सहभाग कौतुकास्पद असल्याचे निवृत्तिनाथ मंदिराचे अध्यक्ष नीलेश गाढवे यांनी सांगितले. त्यांच्या समवेत सचिव सोमनाथ घोटेकर व अन्य विश्वस्त हा सोहळा नेटका व ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासारखा व्हावा, या साठी प्रयत्नशील आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pesticide Ban: उत्तर प्रदेशात बासमती तांदळावर परिणाम करणाऱ्या ११ कीटकनाशकांवर बंदी

Kharif Crop : नवापूरमधील संततधारेने पिकांना जीवदान

Jalgaon Rainfall : जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ६२ टक्के पाऊस

Crop Damage Survey : अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू

Agrowon Podcast: आले दरात सुधारणा; सोयाबीन किंमतीत वाढ, हरभरा स्थिर, शेवगा आवक वाढली, केळीचे दर कायम

SCROLL FOR NEXT