Cotton Production Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Production : कापूस उत्पादन वाढीसाठी ३३०० हेक्टरवर प्रात्यक्षिके

Kharif Season 2023 : नगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, नेवासा, जामखेड, कर्जत भागांत कापसाची लागवड अधिक होते. अलीकडच्या काळात नगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत कापसाची लागवड होत आहे.

Team Agrowon

Nagar News : कापूस उत्पादन वाढीसाठी यंदा नगर जिल्ह्यात अन्न व पोषण सुरक्षा-व्यापारी पिकेअंतर्गत कापूस विकास कार्यक्रम, राज्य पुरस्कृत कापूस पिकांची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेअंतर्गत दोन्ही योजनेतून नगर जिल्ह्यात ३३०० हेक्टरवर कापूस उत्पादन वाढीसाठी प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत.

शिवाय साडेतीन हजार शेतकऱ्यांना पीक संरक्षण औषधे व बायोएजंट्‍स किटचेही वितरण केले जाणार आहे. सर्व बाबींवर सुमारे एक कोटी ६८ लाखांचा निधी खर्च होणार आहे.

नगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, नेवासा, जामखेड, कर्जत भागांत कापसाची लागवड अधिक होते. अलीकडच्या काळात नगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत कापसाची लागवड होत आहे.

नगर जिल्ह्यात कापसाचे ४ लाख ४७ हजार ८२२ हेक्टर सरासरी क्षेत्र असून यंदा१,१४,३५२ हेक्टरवर कापसाची लागवड होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. मात्र पुरेसा पाऊस नसल्याने कापसाच्या लागवडीला अडथळे येत आहेत. कृषी विभागाकडून यंदा नगर जिल्ह्यात कापूस उत्पादन वाढीसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत.

कापसाच्या सरळ वाणाची अतिघन लागवड पद्धतीने पाथर्डी व शेवगाव तालुक्यांत प्रत्येकी दहा हेक्टरवर लागवड प्रात्यक्षिक असेल. एकात्मिक पीक व्यवस्थापनांतर्गत पाथर्डी, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा तालुक्यांत प्रत्येकी दहा हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके केली जाणार आहेत.

राज्य पुरस्कृत कापूस पिकांची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेअंतर्गत शेतकरी कंपन्या, शेतकरी समूहाच्या मदतीने कापूस उत्पादन वाढीसाठी प्रत्येकी शंभर हेक्टरचा एका अशा पद्धतीने प्रात्यक्षिके राबवली जात आहेत.

त्यात उत्पादन वाढ अंतर्गत पाथर्डीत २ कंपन्यांमार्फत ८०० हेक्टर, कर्जतला एका कंपनीमार्फत ४०० हेक्टर व शेवगावला चार कंपन्यांमार्फत १६०० हेक्टर, अतिघन लागवड योजनेतून पाथर्डी व जामखेडला प्रत्येकी एका शेतकरी समुहामार्फत प्रत्येकी १०० हेक्टर, शेवगावला २ शेतकरी समूहामार्फत २०० हेक्टर प्रत्यक्षिके घेतली जाणार आहेत.

आद्यरेषीय आंतरपिके, एकात्मिक पीक व्यवस्थापन, उत्पादकता वाढ यासाठी प्रत्येक हेक्टरसाठी आठ हजार, कापसाच्या सरळ वाणाची अतिघन लागवडीसाठी हेक्टरी १० हजार, पीक संरक्षण औषधे व बायोएजंट्‍स किटसाठी प्रत्येकी ५०० रुपये असे एकूण १ कोटी ६८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

पीक संरक्षण किट, शेतीशाळा

नगर जिल्ह्यात कापूस पीक प्रात्यक्षिकांससोबत साडेतीन हजार शेतकऱ्यांना पीक संरक्षण औषधे व बायोएजंट्‍स किटचेही वितरण केले जाणार आहे. याशिवाय कापूस उत्पादनाबाबतच्या विविध माहिती, मार्गदर्शनासाठी १२८ शेतीशाळा घेतल्या जाणार आहेत, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Compensation: पीकविम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार; २०२२ ते रब्बी २०२४-२५ ची भरपाई मिळणार

Agrowon Podcast: कापूस दर दबावातच; उडद- ढोबळी मिरचीचे भाव स्थिर, काकडीचे दर नरमले, तर पेरुचा आवक स्थिर

Ragi Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात, नाचणी रोप लागवड पूर्ण

Solar Power: सांगली, कोल्हापुरात ‘सौर कृषिवाहिनी’ योजनेला गती द्या; लोकेश चंद्र

Monsoon Rain: आज, उद्या राज्यात पावसाची शक्यता; विदर्भात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT