Bogus Seed Agrowon
ताज्या बातम्या

Bogus Seed : बोगस बियाणे, खते विक्रेते, कंपनीवर गुन्हे दाखल करा

Bogus Fertilizer : कापसाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. या दुःखातून शेतकरी बाहेर पडत नाही. तो लागलीच पेरणीनंतर त्याच्यावर बोगस बियाणे व खते यांनी संकटात टाकण्याचे काम केलेले आहे.

Team Agrowon

Agriculture Inputs : तालुक्यातील व्यापाऱ्यांनी बनावट बियाणे व रासायनिक खताची विक्री केली असून, संबंधित विक्रेते व कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी काल (ता. १७) शेतकऱ्यांनी तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्याकडे केली.

कापसाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. या दुःखातून शेतकरी बाहेर पडत नाही. तो लागलीच पेरणीनंतर त्याच्यावर बोगस बियाणे व खते यांनी संकटात टाकण्याचे काम केलेले आहे. जामनेर तालुक्यातील कृषी केंद्रात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे व खते विकली गेली.

त्यामुळे शेतकऱ्यांला कपाशी, सोयाबीन, मिरची या पिकांच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बोगस बियाणे दिल्यामुळे आज पिकांची वाढ होत नाही. कपाशी लाल, पिवळी, काळी पडत आहे. त्याबरोबर पिकांची वाढ सुद्धा खुंटली आहे. बोगस खतांमुळे पीक अक्षरशः जळून गेलेली आहेत.

त्यामुळे बोगस बियाणे व खते विकणाऱ्या कंपनी व कृषी केंद्रावर तत्काळ गुन्हे दाखल करा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने प्रयत्न न करता अंमलबजावणी करून तत्काळ मदत द्यावी, या आशयाचे निवेदन जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले.

या वेळी तोंडापूर, फत्तेपूर, शेंगोळे, मोयखेडा, सामरोद परिसरातील असंख्य शेतकरी जामनेर युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण व शहरप्रमुख अतुल सोनवणे सहभागी होते. दरम्यान, रासायनिक खते व बियाणे कृषी कंपन्यांच्या राखीव ‘सीएसआर’ निधीतून या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख राहुल चव्हाण यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Purchase Fraud: सोयाबीन खरेदी केंद्रांसाठी पैसे, शेतकऱ्यांचा नऊ टक्के ओलाव्याचा सोयाबीन नाकारला; वडेट्टीवारांचा विधानसभेत गंभीर आरोप

Dairy Development: दुग्ध विकास योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश

Agriculture Schemes: कृषी योजनांसाठी हवा दोन हजार कोटींचा निधी

Tur Crop: बी.डी.एन. ७११ आणि गोदावरी वानामुळे तुरीचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे

Farmer Demand: सरकारने आकडे दाखवून शेतकऱ्यांना फसवले

SCROLL FOR NEXT