Fertilizer Demand Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer Demand : खरिपासाठी दोन लाख टन खतांची मागणी

Kharif Season : जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे सुमारे २ लाख २ हजार ४५० टन खताची मागणी नोंदविली आहे.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे सुमारे २ लाख २ हजार ४५० टन खताची मागणी नोंदविली आहे. गेल्या वर्षीची ७७ हजार ५९८ टन खते शिल्लक आहेत. मागणी केलेल्या खतांचा कोटा मंजूर केल्यास मोठ्या प्रमाणात खते उपलब्ध होतील, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी दोन लाख ७ हजार २५० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी दोन लाखांहून अधिक हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. यामध्ये भाताच्या व सोयाबीनच्या क्षेत्राच्या वाढ होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे खतांच्या मागणीत वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कृषी विभागानेही खताच्या अडचणी येऊ नये म्हणून नियोजन केले आहे. लवकरच कृषी आयुक्तालयाकडून या खतास मंजुरी मिळेल. त्यानंतर शेतकऱ्यांना या खताचा पुरवठा होईल.

यंदा सरळ खतामध्ये युरिया, अमोनिअम, एमओपी आणि एसएसपी अशा खतांचा समावेश होत आहे. यंदा युरियाची ८९ हजार ५१० टन, डीएपी १४ हजार ७६०, एमओपी ७ हजार ८६०, एसएसपी २१ हजार ९८० टन, तर संयुक्त व मिश्र खतांमध्ये ६८ हजार ३४० टन खतांची मागणी केली आहे.

गेल्या खरिपात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे दोन लाख ९१ हजार ९०० टन खताची मागणी नोंदविली होती. त्यानंतर कृषी विभागाने कमी-अधिक प्रमाणात खताचा पुरवठा केल्याने काही वेळा टंचाई भासली. रब्बीत मोठ्या प्रमाणात खताचा पुरवठा झाल्यामुळे खते शिल्लक राहिल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षीची शिल्लक खते (टनांत) :

खतांचा प्रकार--- खरिपातील खत वापर---शिल्लक खते

युरिया ---९९०२२---३३,७१७

डीएपी---१७,५१४---७५४८

एमओपी ---११,३९४---६३७

संयुक्त, मिश्र खते---६७,६१२ ---२६,३९१

एसएसपी---२६,२८९---९३०५

गेल्या वर्षीची खते शिल्लक आहेत. त्यामुळे चालू वर्षी मागणीत काही प्रमाणात घट केली आहे. या खतांना मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा पुरवठा करण्यात येईल. सध्या जवळपास ७७ हजार ७९८ टनांहून अधिक खते शिल्लक आहेत. त्यामुळे खरिपात शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT