Raju Shetti Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Incentive Scheme : प्रोत्साहनपर अनुदान तातडीने देण्याची मागणी

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाची यादी येऊन महिना होऊन गेला तरीही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेच जमा झालेले नाहीत.

Team Agrowon

Farmer Loan Waive Scheme कोल्हापूर : नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाची (Incentive Subsidy) यादी येऊन महिना होऊन गेला तरीही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेच जमा झालेले नाहीत.

ही रक्कम मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची भेट घेतली. फेब्रुवारीअखेर वित्त विभागाच्या मान्यतेनंतर मार्चअखेर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली.

शासनाच्या घोषणेनंतरही तब्बल एक महिन्याने पहिली यादी आली. या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर जाऊन आधार प्रमाणिकरण केले, त्याचा संदेशही संबंधितांच्या मोबाइलवर आला, पण प्रत्यक्ष रक्कम अद्याप खात्यावर जमा झाली नाही.

शासनाच्या नियमानुसार ज्या दिवशी आधार प्रमाणीकरण होईल, त्याच दिवशी ही रक्कम जमा होणार होती. म्हणून शेतकरी बँकेत हेलपाटे मारत आहेत, पण शासनाकडून निधीच न आल्याने ही रक्कम जमा न झाल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे.

या भेटीनंतर मुख्य सचिवांनी राज्याचे सहकार सचिव व वित्त सचिवांना ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे, अशा दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांचे अनुदान येत्या आठवड्याभरात जमा करण्याच्या सूचना देऊन सदरचे अनुदान तातडीने वितरित करण्याबाबत आदेश दिले.

सध्या तिसऱ्या यादीतील अनुदानाचा प्रस्ताव वित्त विभागाकडे असून, फेब्रुवारीअखेर ही मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करून पुरवणी मागणीतून मार्चअखेरपर्यंत सर्व अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seafood Export: अमेरिकेच्या आयातशुल्क वाढीचा कोळंबी निर्यातीवर परिणाम, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंची माहिती

FSSAI Registration: दूध उत्पादक-विक्रेत्यांना एफएसएसएआय नोंदणी सक्तीची

Unseasonal Rain: माकणी परिसरात पाऊस, गारपीट

Krishi Kumbh Exhibition: ‘कृषिकुंभ’कडे मंत्री, लोकप्रतिनिधींची पाठ

Unseasonal Rain Damage: ‘अवकाळी’ने रब्बी पिकांसह फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT