Rabi Season
Rabi Season Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Season : रब्बीसाठी पंचेचाळीस हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

टीम ॲग्रोवन

नगर ः नगर जिल्ह्यात यंदा रब्बीचे (Rabi Season) ४ लाख ७४ हजार ५९० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. गेल्या तीन वर्षांत झालेल्या बियाणे विक्रीच्या सरासरीनुसार यंदा बियाण्यांची मागणी केली आहे. यंदा ४५ हजार ३७५ बियाण्यांची मागणी केली आहे. त्यातील साधारण पन्नास टक्क्याच्या जवळपास बियाणे (Agricultural Seeds) उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले.

नगर जिल्ह्यात रब्बीचे सरासरी ४ लाख ५७ हजार १२६ हेक्टर क्षेत्र आहे. कृषी विभागाने यंदा ४ लाख ७४ हजार ५९० हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी होण्याचा अंदाज गृहीत धरून नियोजन केले आहे. गेल्यावर्षी ४ लाख २३ हजार ९६३ हेक्टरवर पेरणी झाली होती.

सर्वाधिक क्षेत्र ज्वारीचे आहे. गेल्या वर्षी १ लाख ९० हजार ६२० हेक्टरवर ज्वारी पेरली गेली होती. यंदा २ लाख १० हजार हेक्टरवर पेरणीचा अंदाज आहे. एक लाख सहा हजार हेक्टरवर गहू, तर १ लाख २ हजार हेक्टरवर हरभरा पेरला गेला. २०१९ मध्ये ३० हजार ३३९ क्विंटल, २०२० मध्ये ३५ हजार ०९३ क्विंटल,

तर गेल्या वर्षी ३८ हजार ८८६ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. त्या अनुषंगाने यंदा ४५ हजार ७३५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. दरम्यान, यंदा सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांत वाफसा नसल्याने रब्बीच्या पेरण्या लांबण्याची शक्यता आहे.

बियाणे मागणी (क्विंटल)

ज्वारी ः ४२००, गहू ः २७,३७५, हरभरा ः १३,६५०, सूर्यफूल ः ४, करडई ः १, मका ः ४००.

प्रस्तावित क्षेत्र (कंसात सरासरी क्षेत्र) ः ज्वारी ः २,१०,००० (२,६७,८३४), गहू ः १,०९,५०० (८६,४०५), हरभरा ः १,३०,००० (८८,३७७), सूर्यफूल ः ४० (३१), करडई ः ५० (३६१), मका ः २५,००० (१४,११८).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT