Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : पिकांच्या पंचनाम्यास विलंब

वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी व कृषी विभागाचा कोणताही अधिकारी आला नाही.

Team Agrowon

Chhatrapati Sambhaji Nagar वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे (Hailstorm) झालेल्या नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Survey) करण्यासाठी तलाठी व कृषी विभागाचा कोणताही अधिकारी आला नाही. त्यामुळे विहामंडवा येथील एका संतप्त शेतकऱ्याने आपल्या दोन हेक्टर शेतातील टरबूज पीक उपटून फेकले.

विहामांडवा येथील शेतकरी गणेश कृष्णा गोरे यांनी अडीच लाख रुपये खर्च करून दोन हेक्टर शेतामध्ये टरबूज पीक लावले. गारपीट आणि वादळी पावसामुळे टरबूज पिकाचे मोठे नुकसान झाले.

त्यामुळे हवालदिल झालेले गोरे सकाळी सहा वाजल्यापासून तलाठ्यांना फोन करत होता. मात्र त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. संध्याकाळी चार वाजेपर्यंत शेतात पंचनाम्यासाठी कोणताही अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे गोरे यांनी शेतामधील संपूर्ण टरबूज पीक उपटून फेकले.

गारपिटीनंतर प्रशासनाने किमान सहानुभूती तरी दाखवायला हवी होती. शेतामध्ये कोणीही अधिकारी आला नाही. तलाठ्यांना फोन लावला असता कृषी सहायकांबरोबर येतो, मग फोटो काढू, असे उत्तर दिले. चार वाजेपर्यंतही अधिकारी येथे आला नाही. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावेत. मदत द्यावी.

- गणेश कृष्णा गोरे, नुकसानग्रस्त शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT