leopard attacks
leopard attacks Agrowon
ताज्या बातम्या

Leopard Attack : बिबट्याने पाडला गाय, हरणाचा फडशा

Team Agrowon

मेहुणबारे, जि. जळगाव ः गिरणा पट्ट्यात बिबट्याकडून (Leopard Attack) गुरांवर होणाऱ्या हल्ल्यांचे सत्र अद्याप सुरूच आहे. बहाळ (ता. चाळीसगाव) येथे बिबट्याने गायीचा (Cow Died In Leopard Attack) तर करगाव तांडा शेतशिवारात हरणाच्या पाडसाचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली.

या घटनेनंतर पशुपालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सध्या शेतीकामाचे दिवस सुरू असून, वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

बहाळ येथील शेतकरी व दुग्ध व्यावसायिक असलेले शब्बीर बाबू मलक यांच्या गुढे रस्त्यालगतच्या गायत्री पेट्रोलपंपामागे असलेल्या गोठ्यातील गायीचा बुधवारी पहाटे चारच्या सुमारास बिबट्याने फडशा पाडल्याने परिसरात खळबळ उडाली. या गाईची किंमत एक लाख रुपये आहे. तर दुसरीकडे करगाव, इच्छापूरतांडा या शेतशिवारात हरणाच्या पाडसाचा बिबट्याने फडशा पाडल्याची दुसरी घटना घडली. या घटनेने भीतीचे वातावरण पसरले आहे.

वन विभागाचे आवाहन

करगाव, इच्छापूर तांडा शिवारात वसंत राठोड व वाल्मीक राठोड यांना त्यांच्या गट नं.१४० या परिसरात बिबट्या सदृश प्राणी दिसला असून त्या ठिकाणी हरणाचे पाडस मृतावस्थेत दिसून आले.

या भागात वन विभागामार्फत शेतकऱ्यांना रात्री शेतात जाण्याचे टाळावे व दिवसा २-४ लोकांच्या टोळीने सावधागिरी बाळगून शेतात जावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

शेतकरी भयभीत

बहाळ शिवारात दोन दिवसांपूर्वी राकेश चौधरी यांना बिबट्या दिसला होता; मात्र त्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही.

त्या ठिकाणी वन विभागामार्फत ट्रॅप कॅमेरा लावण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. बहाळसह परिसरात बिबट्या असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT